मेस्सीचे धडाक्यात पुनरागमन
By admin | Published: September 3, 2016 12:41 AM2016-09-03T00:41:56+5:302016-09-03T00:41:56+5:30
निवृत्तीचा निर्णय फिरविल्यानंतर मैदानावर धडाकेबाज पुनरागमन करणाऱ्या लियोनेल मेस्सी याने निर्णायक गोल नोंदवून २०१८ च्या विश्वचषक पात्रता सामन्यात अर्जेंटिनाला
मेंडोज : निवृत्तीचा निर्णय फिरविल्यानंतर मैदानावर धडाकेबाज पुनरागमन करणाऱ्या लियोनेल मेस्सी याने निर्णायक गोल नोंदवून २०१८ च्या विश्वचषक पात्रता सामन्यात अर्जेंटिनाला पारंपरिक प्रतिस्पर्धी ऊरुग्वेवर १-० असे विजयी केले.
रशियात होणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषकासाठी पात्रता सामन्यात विजय मिळविल्याने अर्जेंटिना द. अमेरिका गटात अव्वल स्थानी आला आहे. मेस्सीने आपल्या अंदाजात विक्रमी ५६ वा गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. मध्यांतराच्या दोन मिंिनटेआधी मेस्सीने ४३ व्या मिनिटाला गोल केला.
चेंडू ऊरुग्वेचा बाचवफळीतील खेळाडू मारिया गिमेनेजला लागून गोलकिपर फर्नांडो मुसलेरा याला चकवित गोलजाळीत गेला. संघाच्या विजयात हाच गोल निर्णायक ठरला. अर्जेंटिनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ३१ व्या मिनिटाला उत्कृष्ट शॉटवर गोल नोंदविण्याचा प्रयत्न करणारा युवा फॉरवर्ड पावलो दाएबाला याला हाफटाईमआधीच दुसरे येलो कार्ड मिळाल्याने तो मैदानाबाहेर गेला. यानंतर संघ उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळत राहिला. पूर्वार्धात बाचावात्मक खेळणाऱ्या उरुग्वेने मेस्सीच्या गोलनंतर आक्रमक धोरण अवलंबले. त्यांचा स्टार लुईस सुवारेजचे उत्कृष्ट प्रयत्न अर्जेंटिनाचा झेव्हियरने थोपवले.
स्टायलिश विनिंग कमबॅक
निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुनरागमन केलेल्या स्टार लिओनेल मेस्सी याने या सामन्यादरम्यान आपल्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ब्लॉन्ड हेअर आणि वाढवलेली दाढी
यामुळे मेस्सीच्या या लूकची बरीच चर्चा झाली.
लिओनेल मेस्सीचे हे नवे ‘गोल्डन लूक’ संघासाठी देखील खऱ्या अर्थाने गोल्डन ठरले. सामन्यातील एकमेव गोल नोंदवताना मेस्सीने आपल्या जादुई खेळाच्या जोरावर पारंपारिक प्रतिस्पर्धी उरुग्वेला नमवले. (वृत्तसंस्था)
विजयी संघाच्या बचावफळीने देखील सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली. दहा देशांच्या द. अमेरिका गटात अर्जेंटिना सात विजयांसह १४ गुण घेत आघाडीवर आहे. उरुग्वे, कोलंबिया व इक्वाडोर यांचे प्रत्येकी १३ गुण आहेत. कोलंबियाने व्हेनेझुएलाचा २-० ने पराभव केला. ब्राझीलने इक्वाडोरचा ३-० ने पराभव
करीत १२ गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली.