मेस्सीचा धडाकेबाज ‘पंच’

By admin | Published: January 13, 2016 03:53 AM2016-01-13T03:53:50+5:302016-01-13T03:53:50+5:30

सध्या जागतिक फुटबॉलमध्ये आपला एकहाती दबदबा राखलेला अर्जंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा ‘बालोन डी ओर’ पुरस्कार पटकावला.

Messi striker 'punch' | मेस्सीचा धडाकेबाज ‘पंच’

मेस्सीचा धडाकेबाज ‘पंच’

Next

झुरिक : सध्या जागतिक फुटबॉलमध्ये आपला एकहाती दबदबा राखलेला अर्जंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा ‘बालोन डी ओर’ पुरस्कार पटकावला. यासह त्याने फुटबॉल जगतावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मेस्सीला पोर्तुगालचा स्टार खेळाडू आणि कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच बार्सिलोना एफसीमधील आपला सहकारी व ब्राझीलचा अव्वल खेळाडू नेमार यांच्याशी स्पर्धा करावी लागली. मात्र, मेस्सी या दोघांपेक्षा वरचढ ठरला.
झुरिकमध्ये झालेल्या वार्षिक ‘फिफा’ बालोन डी ओर पुरस्कार सोहळ्यात मेस्सीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी लाखो फुटबॉलप्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती. या पुरस्कारासाठी विजेत्या खेळाडूची निवड राष्ट्रीय संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आली.
या पुरस्कारासाठी मेस्सीने सर्वाधिक ४१ टक्के मते मिळवली. त्याच वेळी रोनाल्डो आणि नेमार यांना अनुक्रमे २७.७६ टक्के आणि ७.८६ टक्के मते मिळाली. बार्सिलोनाच्या या स्टार खेळाडूने गत वर्षी खेळलेल्या सामन्यांत एकूण ४८ गोल नोंदविले असून, ‘ला लीगा’ स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत मेस्सी दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, २०१४-१५ मोसमामध्ये त्याने सर्वाधिक गोल नोंदविण्याची कामगिरी केली.
त्याच वेळी बार्सिलोना संघाचे प्रशिक्षक लुईस एनरिक यांनी ‘फिफा’च्या ‘सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉल प्रशिक्षक’ किताबावर कब्जा केला. तर, महिला फुटबॉल गटात २०१५ महिला विश्वचषकविजेत्या अमेरिका संघाने दोन विजेतीपदे पटकावून आपले वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi striker 'punch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.