मेस्सीचा २५वा गोल; बार्सिलोना ३-१ने विजयी
By Admin | Published: January 13, 2015 02:13 AM2015-01-13T02:13:52+5:302015-01-13T02:13:52+5:30
ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली
बार्सिलोना : ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली. त्याच्या व्यतिरीक्त नेमार व लुईस सुआरेजने प्रत्येकी १ गोल करत गतविजेत्या अॅटलेटीको डी माद्रीद संघाचा ३-१ गोलने पराभव केला.
कॅपनाउनमध्ये झालेल्या या लढतीत मेस्सीने विरुद्ध संघाच्या डिफेन्डरांना चकवित १२व्या मिनिटाला नेमारला पास दिला त्याने कोणतीही चूक न करता चेंडू गोलमध्ये टाकला. त्यानंतर ३५व्या मिनिटाला मेस्सीने सुआरेजला उत्कृष्ट पास दिला. या पासवर सुद्धा सुआरेजने संघाचा दुसरा गोल नोंदविला. ५७व्या मिनिटाला अॅटलेटिकोच्या मारियो मांदजूकीचने आपल्या संघाचा गोल करून १-२ अशी गोल स्थिती केली. विश्रांतीला ३ मिनिटे बाकी असताना मेस्सीने संघाचा तिसरा व या स्पर्धेतील आपला २५वा गोल नोंदिवला.
(वृत्तसंस्था)