मायकल फेल्प्स अडकला लग्नाच्या बेडीत

By admin | Published: October 28, 2016 12:02 PM2016-10-28T12:02:08+5:302016-10-28T12:02:08+5:30

ऑलिंम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील महान खेळाडू मायकल फेल्प्स विवाहबद्ध झाला आहे.

Michael Phelps stuttering wedding | मायकल फेल्प्स अडकला लग्नाच्या बेडीत

मायकल फेल्प्स अडकला लग्नाच्या बेडीत

Next

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २८ - ऑलिंम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील महान खेळाडू मायकल फेल्प्स विवाहबद्ध झाला आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या रिओ ऑलिंम्पिकआधीच फेल्प्सने गर्लफ्रेंड निकोल जॉन्सनबरोबर गुपचूप विवाह केला होता. फेल्प्स आणि जॉन्सन दोघे ३१ वर्षांचे असून, १३ जून रोजी अॅरीझोनाच्या पॅराडाईजमध्ये दोघांनी गपचुप विवाह केला. 
 
अॅरीझोना येथील एका वर्तमानपत्राने फेल्प्सच्या विवाहाची कागदपत्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये फेल्प्सचा साखरपुडा झाला होता. फेल्प्सची पत्नी निकोल माजी मिस कॅलिफोर्निया आहे. 
 
सलत तीन ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये जलतरण तलावावर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या फेल्प्सने रिओमध्ये कारकिर्दीतील विक्रमी २३ वे सुवर्णपदक जिंकले. कदाचित हे त्याचे ऑलिम्पिकमधील शेवटचे पदक असू शकते कारण यापुढे ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे फेल्प्सने जाहीर केले आहे. 
 

Web Title: Michael Phelps stuttering wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.