केविनच्या जोरावर एमआयजी विजयी

By admin | Published: November 7, 2016 05:51 AM2016-11-07T05:51:23+5:302016-11-07T05:51:23+5:30

केविन डी’अल्मेडाच्या शानदार नाबाद १४२ धावांच्या जोरावर बलाढ्य एमआयजी क्रिकेट क्लब संघाने तुल्यबळ डॉ. डीवाय पाटील एसए संघाचा ६९व्या पोलीस शिल्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात ५ विकेट्सने पराभव केला.

MIG won by Kevin | केविनच्या जोरावर एमआयजी विजयी

केविनच्या जोरावर एमआयजी विजयी

Next

मुंबई : केविन डी’अल्मेडाच्या शानदार नाबाद १४२ धावांच्या जोरावर बलाढ्य एमआयजी क्रिकेट क्लब संघाने तुल्यबळ डॉ. डीवाय पाटील एसए संघाचा ६९व्या पोलीस शिल्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात ५ विकेट्सने पराभव केला.
वांद्रे येथील एमआजी मैदानावर झालेल्या या दोनदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डीवाय पाटील संघाने ७० षटकात ८ बाद ३१८ धावा काढल्या. सर्वेश दामले याने १५३ चेंडूत १७ चौकार व एका षटकारासह १२७ धावांची खेळी केली. तसेच, जे. सिंग (९०), योगेश ताकवले (३६*) यांनीही उपयुक्त खेळी करताना संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. प्रतीक दाभोळकरने (३/५७) अचूक मारा करुन डीवाय पाटील संघाच्या धावसंख्येला वेसण घातली.
यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या एमआयजी संघाने आक्रमक खेळी केली. केविनने १३१ चेंडू खेळताना १३ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचताना शानदार १४२ धावांची नाबाद खेळी केली. संदीप कुंचिकोरने देखील ७४ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर एमआयजीने ६७.१ षटकातच विजय निश्चित करताना ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ३१९ धावा फटकावल्या.
दुसरीकडे, ‘ब’ गटामध्ये पय्याडे स्पोटर््स क्लबला कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनविरुध्द ३ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पय्याडेचा डाव ६७.२ षटकात २५१ धावांत संपुष्टात आला. विद्याधर कामत (५/६०) आणि शिवम दुबे (४/४५) यांच्यापुढे पय्याडेची दाणादाण उडाली. प्रसाद पवारने (७०) पय्याडेकडून एकाकी झुंज दिली.
यानंतर, कर्नाटक स्पोर्टिंगने अनुप रेवंडकर (५४), शुभम दुबे (४४) यांच्या जोरावर ५१.२ षटकात ७ बाद २५२ धावा काढून बाजी मारली. एकवेळ पय्याडेने अचूक मारा करुन कर्नाटक स्पोर्टिंगला अडचणीत आणले होते. मात्र, अनुप व शुभम यांनी संयमी खेळी करुन सांघाला सावरले. प्रदीप साहू याने ८१ धावांत अर्धा संघ बाद करुन पय्याडेच्या
आशा उंचावल्या होत्या. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: MIG won by Kevin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.