दिग्गज मुष्टीयोद्धा माइक टायसन २९ सप्टेंबरला येणार मुंबईत; भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:02 AM2018-09-05T01:02:34+5:302018-09-05T01:02:53+5:30
जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल
मुंबई : जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल. एमएमए कुमिते १ लीगचे मुख्य आयोजक मोहम्मदअली बुधवानी यांनी याविषयी ‘लोकमत’ला माहिती दिली.
आॅल इंडिया मिक्स मार्शल आटर््स फेडरेशन (एआयएमएमएएफ) आणि वर्ल्ड किकबॉक्सिंग नेटवर्क (डब्ल्यूकेएन) यांच्या मान्यतेने होत असलेल्या या लीगसाठी दिग्गज टायसन मुख्य चेहरा असेल. यानिमित्ताने पहिल्यांदाच भारत दौºयावर येत असलेल्या टायसन यांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उत्सुकता उंचावली आहे. या लीगची पहिली ‘नाइट फाइट’ २९ स्पटेंबरला वरळी येथील एनएससीआय डोम बंदिस्त स्टेडियममध्ये होईल. यावेळी भारत वि. यूएई या लढतीने या लीगला सुरुवात होईल. विशेष म्हणजे सांघिक स्तरावर होणारी ही लीग एमएमए खेळाच्या इतिहासातील पहिली सांघिक स्पर्धा ठरेल.
एकूण ८ देशांचा सहभाग असलेल्या या लीगमध्य यजामन भारतासह यूएई, रशिया, चीन, अमेरिका, यूके, पाकिस्तान व बहारीन या देशांचा सहभाग असेल. प्रत्येक संघात ९ खेळाडूंचा समावेश असून एका महिला खेळाडूचा समावेश अनिवार्य असेल. तसेच, एमएमए खेळाची गुणपद्धत सर्व प्रेक्षकांना कळण्यासाठी या लीगच्या आयोजकांनी विशेष प्रणाली तयार केली असून याद्वारे लाइव्ह गुणपद्धत दाखविण्यात येईल. एमएमए खेळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी लाइव्ह गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजक बुधवानी यांनी दिली.
- ८ संघांसाठी लिलाव प्रक्रीयेतून खेळाडूंची निवड होणार असून या लिलावाचे आयोजन भारत, दुबई, लास वेगास व लंडन येथे होईल.
- भारतीय फायटर्सना या लीगमध्ये संधी मिळण्यासाठी के१एल स्थानिक पातळीवर ‘टॅलेंट हंट’ राबविणार असून यातून गुणवान खेळाडूंची निवड होईल, अशी माहिती आयोजक बुधवानी यांनी दिली. लीगच्या पहिल्या हंगामासाठी मुंबई, दिल्ली. कोलकाता आणि बंगळुरु येथे टॅलेंट हंटचे आयोजन होईल.