माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 07:40 PM2024-11-15T19:40:55+5:302024-11-15T19:42:02+5:30
Mike Tyson vs Jake Paul Fight: दिग्गज माइक टायसन आणि जेक पॉलच्या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Mike Tyson vs Jake Paul Fight: जगप्रसिद्ध वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन 19 वर्षांनंतर रिंगमध्ये पुनरागमन करत आहे. यावेळी त्याची स्पर्धा युवा बॉक्सर जेक पॉलशी आहे. हा सामना अमेरिकेतील टेक्सास येथे होणार असून, या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून आहे. याचे कारण म्हणजे, एकीकडे 27 वर्षीय जेक पॉल आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत केवळ एकच फाईट हारली आहे, तर दुसरीकडे 51 वर्षीय माइक टायसन आहे, ज्याच्यासमोर भलेभले यायला घाबरायचे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये या दोघांची फाइट होणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या, शनिवारी सकाळी 6.30 वाजता ही लढत नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. या लढतीकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही बॉक्सर्सना या सामण्यासाठी प्रचंड पैसा मिळत आहे.
Jake Paul crawled like a monkey to Tyson, it’s such a racist show off and Mike gave him a smart slap to start with. pic.twitter.com/3PZ5Mi7JDB
— CHULO🇹🇷 (@felixbuezecyrus) November 15, 2024
कोणाला किती रुपये मिळणा?
माइक टायसन 19 वर्षांनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करत आहे. टायसनची लोकप्रियता आजही इतकी आहे की, त्याला या सामन्यासाठी 20 मिलियन डॉलर्स, म्हणजेच 168 कोटी रुपये मिळत आहेत. माईक टायसन हा सामना जिंकला किंवा हरला तरी त्याला ही रक्कम मिळेल. दुसरीकडे, जेक पॉलला टायसनपेक्षा दुप्पट पैसे मिळत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेक पॉलला या एका फाईटसाठी 40 मिलियन डॉलर्स मिळत आहेत, जे भारतीय चलनात 337 कोटी रुपये होतात.
टायसन आणि जेक पॉल यांचा विक्रम
जेक पॉलबद्दल सांगायचे तर हा खेळाडू 6 फूट एक इंच उंच आहे. पॉलने आतापर्यंत 11 लढती खेळल्या आहेत, त्यापैकी 10 लढती त्याने जिंकल्या आहेत. जेक पॉलने नॉक आउट करून 7 लढती जिंकल्या आहेत. तर, माइक टायसनची उंची 5 फूट 10 इंच आहे. टायसनने आपल्या कारकिर्दीत 58 पैकी 50 लढती जिंकल्या आहेत. यापैकी 44 लढती नॉक आउट करून जिंकल्या आहेत. टायसन आपल्या काळातील सर्वात क्रुर बॉक्सर्सपैकी एक होता. त्याच्यासमोर यायला भलेभले घाबरायचे.