मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 05:16 IST2021-06-06T05:16:19+5:302021-06-06T05:16:45+5:30
Milkha Singh : शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले.

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती
चंदीगड : कोरोनाशी झुंज देणारे महान धावपटू ‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. चंदीगड येथील पीजीआयएमआर (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च) रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. रुग्णालयाने शनिवारी ही माहिती दिली. मिल्खा सिंग अद्याप कृत्रिम ऑक्सिजनच्या आधारावर आहेत. तीन डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष देत आहे.
पीजीआयएमईआरचे प्रा. अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्खा सिंग यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय मापदंडाच्या आधारे कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती चांगली आहे.’ शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले.