मिलोस राओनिक दुसऱ्या फेरीत
By admin | Published: May 24, 2016 04:28 AM2016-05-24T04:28:28+5:302016-05-24T04:28:28+5:30
आठव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकने चमकदार खेळ करून सर्बियाच्या यांको टिप्सारेव्हीचा सोमवारी ६-३, ६-२, ७-६ ने पराभव केला व फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष
पॅरिस : आठव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकने चमकदार खेळ करून सर्बियाच्या यांको टिप्सारेव्हीचा सोमवारी ६-३, ६-२, ७-६ ने पराभव केला व फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सहा फूट पाच इंच उंची लाभलेल्या राओनिकने पहिल्या दोन सेटमध्ये सहज सरशी साधली आणि टायब्रेकपर्यंत लांबलेल्या तिसऱ्या सेटमध्ये ७-५ ने बाजी मारली. वर्षातील दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे खेळ अडीच तास उशिरा सुरू झाला. पहिल्या दिवशीही पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ १० सामने शक्य झाले. त्यामुळे एकेरीचे ६६ सामने सोमवारी खेळविण्यात येणार आहेत. महिला एकेरीच्या लढतीत १९व्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सने रशियाच्या मार्गरिटा गेस्परायनचा ६-४, ६-३ ने, तर पॅराग्वेच्या वेरोनिका कॅपेडने जर्मनीच्या सबाईन लिसिकीचा ६-२, ६-२ने पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)