क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मागविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:30 AM2020-05-06T00:30:07+5:302020-05-06T00:30:13+5:30
यंदाच्या अर्जुन व खेलरत्न पुरस्कारांसाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंतची कामगिरी विचारात घेतल्या जाणार आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या दावेदारांना ई-मेलद्वारे नामांकन पाठविण्यास सांगितले आहे. कारण क्रीडा मंत्रालय प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्नसह अन्य खेळांच्या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया सुरू करीत आहे.
सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया लॉकडाऊनमुळे मेपर्यंत लांबणीवर पडली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून हा टप्पा १७ मेपर्यंत राहील.
मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ‘कोविड-१९च्या प्रकोपामुळे लॉक़डाऊन सुरू असल्याने मानांकनासाठी कागदी प्रत पाठविण्याची गरज नाही. नामांकनाचा अर्जदार व सिफारिश करणाऱ्या अधिकाºयाची स्वाक्षरी असलेला अर्ज स्कॅन करून ई-मेलद्वारे पाठविता येईल.’ नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख ३ जून निश्चित करण्यात आलेली आहे. परिपत्रकानुसार ‘अंतिम तारखेनंतर मिळणाºया नामांकन अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. कुठल्याही कारणाने उशिर झाला तर त्यासाठी मंत्रालय जबाबदार राहणार नाही.’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये विविध प्रकारांचा समावेश केल्या जातो. खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रशिक्षणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येते तर ध्यानचंद पुरस्कार लाईफटाईम अचिव्हमेंटसाठी मिळतो.
यंदाच्या अर्जुन व खेलरत्न पुरस्कारांसाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंतची कामगिरी विचारात घेतल्या जाणार आहे. दरवेळेप्रमाणे डोपिंगमध्ये दोषी खेळाडू व ज्यांची चौकशी सुरू आहे किंवा प्रलंबित आहे अशांचा नावाचा विचार केला जाणार नाही. खेलरत्न पुरस्कार विजेत्याला ७ लाख ५० हजार तर अर्जुन पुरस्कार विजेत्याला ५ लाख रुपयांची पुरस्कार रक्कम दिली जाते. गेल्या वर्षी पॅरालिम्पियन दीप मलिक व स्टार मल्ल बजरंग पूनिया यांना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)