‘बीआय’ला क्रीडा मंत्रालयाची परवानगी
By Admin | Published: January 3, 2015 01:44 AM2015-01-03T01:44:29+5:302015-01-03T01:44:29+5:30
देशात बॉक्सिंगचे संचालन करणाऱ्या वादग्रस्त ‘बॉक्सिंग इंडिया’ला क्रीडा मंत्रालयाने परवानगी बहाल केली आहे
नवी दिल्ली : देशात बॉक्सिंगचे संचालन करणाऱ्या वादग्रस्त ‘बॉक्सिंग इंडिया’ला क्रीडा मंत्रालयाने परवानगी बहाल केली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे(आयबा)स्थायी सदस्यत्व मिळविणाऱ्या ‘बॉक्सिंग इंडिया’ला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘एम्ब्लेम अँड नेम्स अॅक्ट’अंतर्गत सूचिबद्ध केल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
‘बॉक्सिंग इंडिया’चे अध्यक्ष संदीप जाजोदिया म्हणाले, ‘मंत्रालयाने संपूर्ण पडताळणी केल्यानंतर, कुठलीही त्रुटी आढळली नसल्याने आमच्या संघटनेला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची मान्यता बहाल केली. जाजोदिया यांनी काही दिवसांपासून ‘बॉक्सिंग इंडिया’बाबत सुरू असलेल्या वादावर आज प्रतिक्रिया दिली. ‘बॉक्सिंग इंडिया’ला सूचिबद्ध केल्याबद्दल, त्यांनी क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले. आमचे काम आणि खेळाचे संचालन करण्याच्या पद्धतीवर हे शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बॉक्सिंग इंडिया’चे महासचिव जय कवळी म्हणाले, ‘मान्यता मिळाल्याबद्दल आनंद झाला. ‘बॉक्सिंग इंडिया’ची पहिली एलिट पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिप नागपुरात ८ ते १४ जानेवारी दरम्यान होत आहे. (वृत्तसंस्था)