OMG ! मिराबाई चानूला दुखापत, प्रशिक्षकांनी उचलून बाहेर नेले; भारत पदकापासून वंचित राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:44 PM2023-09-30T16:44:08+5:302023-09-30T16:45:58+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मिराबाई चानूला ( Mirabai Chanu) पदकाने हुलकावणी दिली.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मिराबाई चानूला ( Mirabai Chanu) पदकाने हुलकावणी दिली. ४९ किलो वजनी गटात ११७ किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मिराबाईला दुखापत झाली अन् तिला प्रशिक्षकांनी उचलून स्टेडियमबाहेर नेले. तिने क्लिन अँड जर्कमध्ये १०८ आणि स्नॅच प्रकारात ८३ असे अकूण १९१ किलो वजन उचलले होते आणि चौथ्या स्थानावर होती. थायलंडच्या थायाथोन सुकचारोमेने १९९ किलो भार उचलला आणि चानूने तिला मागे टाकण्यासाठी ११७ किलो वजय उचलण्याचा निर्णय घेतला. पण, तिच्या मांडीत चमक भरली अन् ती वेदनेने बोर्डवर तशीच पडून राहिली.
जर तुम्ही तिच्या कामगिरीचे जवळून अनुसरण केले असेल, तर स्पर्धेतील तिची कामगिरी आश्चर्यकारक नव्हती, २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यापासून मिराबाईने तिची सर्वोत्तम कामगिरी केली नाही. बोगोटामध्येही तिचे डावे मनगट लिफ्टमध्ये अडकले होते आणि त्यातून तिची पुनपणे बरी झाली नव्हती. मे महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ती १९४ किलो ( ९४ + ११३ किलो) भार उचलून सहाव्या स्थानावर राहिली होती. भारताचे शेवटचे वेटलिफ्टिंग आशियाई पदक १९९८ मध्ये आले (कर्णम मल्लेश्वरीचे कांस्य) आले होते