मैराज खानला सिल्वर मेडल

By admin | Published: April 26, 2016 05:40 AM2016-04-26T05:40:22+5:302016-04-26T05:40:22+5:30

भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.

Miraj Khan Silver Medal | मैराज खानला सिल्वर मेडल

मैराज खानला सिल्वर मेडल

Next

रिओ : भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेतील ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.
४० वर्षीय मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर २-१ने पराभव केला. मैराजने अंतिम फेरीच्या क्वालिफाय राउंडमध्ये १२५ पैकी १२२ शॉट्स लगावून फायनलसाठी पात्रता मिळवली. तो ६ नेमबाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी १६ पैकी १५, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली. इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मैराजच्या या कामगिरीवर भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआय) अध्यक्ष रनिंदर सिंह म्हणाले, की मैराजची जिद्द आणि मेहनतीला सलाम करतो. हे यश केवळ नेमबाजांसाठी नाही, तर तमाम खेळाडूंसाठी उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी योग्य दिशानिर्देशांसोबतच लक्ष्य केंद्रित करणेही महत्त्वाचे असते. आॅलिम्पिकसाठी मैराजला शुभेच्छा.
(वृत्तसंस्था)

Web Title: Miraj Khan Silver Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.