मिसबाह बनला गदाधारी

By admin | Published: September 21, 2016 08:41 PM2016-09-21T20:41:48+5:302016-09-21T20:41:48+5:30

पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याला आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप गदा सोपवली.

Misbah became a ghaddar | मिसबाह बनला गदाधारी

मिसबाह बनला गदाधारी

Next

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २१ : आयसीसीतर्फे २00३ पासून सुरुवात झालेल्या कसोटी संघ रँकिंगनंतर प्रथमच अव्वल स्थानी पोहोचणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याला आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप गदा सोपवली.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी येथे गद्दाफी स्टेडियमवर मिसबाहला गदा सोपवली तेव्हा पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाहने गदा सोपवण्याचा सोहळा मैदानावर आयोजित करणे चांगले असल्याचे म्हटले.
मिसबाहने म्हटले, आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा स्वीकरण्यासाठी अशा मैदानापेक्षा चांगले स्थळ असूच शकत नाही. जेथे आम्ही सात वर्षांपूर्वी अखेरची कसोटी खेळली होती.

खेळाडू आणि चाहत्यांसाठी विडंबना म्हणजे नंबर वनचा प्रवास पाकिस्तानच्या बाहेर झाला. खेळाडूंना चाहत्यांच्या प्रोत्साहनाची उणीव भासली तर काही प्रेक्षक चांगल्या संघाला खेळताना आणि वैयक्तिक कामगिरी आपल्यासमोर पाहण्यापासून मुकले; परंतु हे चित्र बदलेल आणि लवकरच पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल याचा विश्वास आहे.

आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतानंतर पाकिस्तान पाचवा संघ आहे जो की, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. मिसबाह हा नववा कर्णधार आहे ज्याने की कसोटी चॅम्पियनशिप गदा उंचावण्याचे भाग्य मिळाले आहे. त्याआधी स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्वच आॅस्ट्रेलिया), महेंद्रसिंह धोनी (भारत), अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ आणि हाशीम अमला (दोन्ही दक्षिण आफ्रिका) यांना सन्मान मिळाला आहे.

रिचर्डसनने पाकिस्तानी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, मार्च २00९ पासून स्वदेशात मालिका न खेळतानाही पाकिस्तानने नंबर वन कसोटी रँकिंग मिळवणे ही खूप प्रभावी बाब आहे. मार्च २00९ मध्ये येथे श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही कसोटी संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील संघ भारत उद्यापासून तीन कसोटींच्या मालिकेसाठी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दोन हात करीत आहे. भारताने ही मालिका जिंकली, तर ते नंबर वनवर कब्जा मिळवतील. पाकिस्तानलादेखील वेस्ट इंडीजविरुद्ध १३ आॅक्टोबरपासून ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे

Web Title: Misbah became a ghaddar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.