मिस्बाह भित्रा आणि स्वार्थी खेळाडू : अख्तर
By admin | Published: February 23, 2015 02:17 AM2015-02-23T02:17:50+5:302015-02-23T02:17:50+5:30
वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाक संघाचा कर्णधार
कराची : वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाक संघाचा कर्णधार मिस्बाह उल हक याच्यावर टीका करताना हा खेळाडू भित्रा आणि स्वार्थी असल्याचे म्हटले आहे़
अख्तर म्हणाला, की मिस्बाहसारखा भित्रा आणि स्वार्थी कर्णधार मी आतापर्यंत बघितला नाही़ जेव्हा संघ अडचणीत होता, तेव्हा त्याने स्वत: मैदानात उतरून दुसऱ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरायला हवे होते़ मात्र त्याने तसे केले नाही याची खंत आहे़ पाक संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांच्याकडे कोणतीही दिशा आणि गेमप्लान दिसून येत नाही़ त्यामुळे या संघाला सलग दोन सामन्यांत मात खावी लागली़ पाक संघाचा माजी कर्णधार रमीज राजा म्हणाला, की अनुभवी खेळाडू युनूस खान याने क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली आहे़ त्याने भूतकाळात वन-डेत देशाला अनेक सामने जिंकून दिले आहेत; मात्र आता त्याचा खेळ पूर्वीसारखा राहिलेला नाही़ त्यामुळे त्याने वन-डेतून निवृत्तीच घेतलेली बरी़ माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक म्हणाला, की पाकिस्तान संघाला सांघिक खेळ करता येत नाही़ त्यामुळे संघाला दोन पराभव स्वीकारावे लागले़ या दोन सामन्यांत झालेल्या चुका लवकर दुरुस्त केल्या नाही,तर लवकरच संघ स्पर्धेतून बाहेर होईल, असेही सकलेन म्हणाला़