५.८५ सेकंदानं हुकलं सुवर्ण! भारताच्या चौघांनी दाखवला दम, खात्यात आणखी एक पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 08:14 AM2023-09-25T08:14:19+5:302023-09-25T08:14:54+5:30

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 :  १९ व्या आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली.

miss gold by 5.85 seconds! Asian Games2023 : Shooting : India win Bronze medal in Rowing (Men's Four), Quartet of Jaswinder, Bheem, Punit & Ashish 6:10.81  | ५.८५ सेकंदानं हुकलं सुवर्ण! भारताच्या चौघांनी दाखवला दम, खात्यात आणखी एक पदक

India win Bronze medal in Rowing (Men's Four) in Asian games 2023

googlenewsNext

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 :  १९ व्या आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली. नेमबाजीत 10m Men's Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्डही नोंदवला अन् आशियाई स्पर्धा विक्रमही मोडला. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला.  

ठाण्याचा पाटील! भारताला पहिले सुवर्ण; नेमबाज रुद्रांक्षचा दिव्यांक्ष, ऐश्वर्यसह वर्ल्ड रेकॉर्ड


नौकानयनमध्ये पुरुष सिंगल स्कलमध्ये भारताच्या बलराज पनवार याचे ७ सेकंदाच्या फरकाने कांस्यपदक हुंकले. त्याला ७:०८.७९ सेकंदाच्या वेळेसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतर झालेल्या नौकानयन पुरूष सांघिक गटात ( Rowing Men's Four) जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांनी भारताला कांस्यपदक जिंकून दिले. या चौघांनी चीन व उझबेकिस्तानला टक्कर दिली. ५.८५ सेकंदाच्या फरकाने भारताचे सुवर्णपदक हुकले. भारत ६:१०.८१ मिनिटांच्या वेळेसह तिसरा आला. उझबेकिस्तान ६:०४.९६ मिनिटासह अव्वल, तर चीन ६:१०.०४ मिनिटासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.


- भारताचा जलतरणपटू श्रीहरी याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने २५.४३ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले अन् आता पदकासाठी उद्या तो शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल.  
 

Web Title: miss gold by 5.85 seconds! Asian Games2023 : Shooting : India win Bronze medal in Rowing (Men's Four), Quartet of Jaswinder, Bheem, Punit & Ashish 6:10.81 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.