फटक्यांची निवड चुकली : हरभजन

By admin | Published: April 11, 2016 02:08 AM2016-04-11T02:08:45+5:302016-04-11T02:08:45+5:30

ज्याप्रकारे आमच्याकडून अपेक्षा करण्यात आली होती, त्याप्रकारे फलंदाजी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केल्याने स्पर्धेच्या सलामीलाच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला

Missed the selection of halts: Harbhajan | फटक्यांची निवड चुकली : हरभजन

फटक्यांची निवड चुकली : हरभजन

Next

मुंबई : ज्याप्रकारे आमच्याकडून अपेक्षा करण्यात आली होती, त्याप्रकारे फलंदाजी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केल्याने स्पर्धेच्या सलामीलाच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज हरभजन सिंग याने दिली.
आयपीएल- ९ च्या सलामीच्याच सामन्यात स्पर्धेत नव्याने सहभागी झालेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईचा ९ विकेट्सने धुव्वा उडाला. सामन्यानंतर हरभजनने झालेल्या चुकांबद्दल सांगताना आपली प्रतिक्रिया दिली. ‘‘आम्ही अपेक्षेनुसार खेळ केला नाही. हा सामना आमच्यासाठी कठीण होता. मुंबईची खेळपट्टी बहुतेक फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. मात्र, खराब फटक्यांच्या निवडीने आम्हाला पराभवापर्यंत नेले. आम्हाला आमच्या खेळावर आणखी मेहनत करण्याची गरज आहे.’’
‘‘काहीवेळा खेळताना आम्हाला जास्त वेळ नसल्याचे वाटते. मात्र, एक फलंदाज म्हणून आम्हाला थोडा वेळ घेण्याची आवश्यकता आहे,’’ असेही हरभजनने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Missed the selection of halts: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.