बॉक्सिंगमध्ये मिशन आॅलिम्पिक : प्रशिक्षक स्टीफन
By Admin | Published: July 17, 2017 12:40 AM2017-07-17T00:40:08+5:302017-07-17T07:09:20+5:30
महिला मुष्टियोद्ध्यांसाठी भारतातील पहिले परदेशी प्रशिक्षक स्टीफन कोटालोर्डा हे आपल्यावर या नवीन जबाबदारीकडे फक्त
नवी दिल्ली : महिला मुष्टियोद्ध्यांसाठी भारतातील पहिले परदेशी प्रशिक्षक स्टीफन कोटालोर्डा हे आपल्यावर या नवीन जबाबदारीकडे फक्त काम म्हणून बघत नाहीत, तर एक मिशन म्हणून त्याकडे पाहत आहेत. फ्रान्सचे कोटालोर्डा हे पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत.
युरोपियन बॉक्सिंग महासंघाच्या प्रशिक्षक आयोगाचे सदस्य ४१ वर्षीय कोटालोर्डा म्हणाले, ‘माझ्या मिशनचा उद्देश हा आॅलिम्पिकसाठी महिला संघ तयार करणे होते. त्यामुळे मला यात रस होता. भारतीय बॉक्सिंगचा चांगल्या प्रकारे विकास होत आहे आणि यावर्षी भारतात युवा आणि ज्युनिअर विश्वचॅम्पियनशिपचे आयोजन हा त्याचा पुरावा आहे.’ भारतात गुवाहाटीत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. (वृत्तसंस्था)
फ्रान्समध्ये महिलांसाठी अनुभवी प्रशिक्षक असण्याबरोबरच कोटालोर्डा एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंग आणि विश्व बॉक्सिंग सीरीजचेदेखील नोंदणीकृत प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच सीनिअर महिला संघ व्हिएतनाम येथे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)