मिताली राजने 5,500 धावांचा गाठला टप्पा
By admin | Published: February 15, 2017 02:20 PM2017-02-15T14:20:05+5:302017-02-15T14:40:40+5:30
महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 5,500 धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज दुसरी महिला क्रिकेटर ठरली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 5,500 धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज दुसरी महिला क्रिकेटर ठरली आहे.
श्रीलंकेत खेळल्या जाणा-या विश्वकप क्वालिफायरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राज हिने शानदार खेळी करत 5,500 धावांचा टप्पा पार केला. जागतिक महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा व्रिक्रम इंग्लंडची खेळाडू कार्लोट एडवर्ड हिच्या नावावर आहे. कार्लोट एडवर्डने 5,992 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक मिताली राज हिचा आहे.
विशेष म्हणजे, मिताली राज हिने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळविला आहे.
Congratulations to Mithali Raj on becoming only the second woman to score 5,500 ODI runs, after Charlotte Edwards pic.twitter.com/qjplj2uDBv
— ICC (@ICC) February 15, 2017