मम्मा, आता बस्स झाले...परत ये ना!

By admin | Published: July 10, 2017 01:14 AM2017-07-10T01:14:36+5:302017-07-10T01:14:36+5:30

काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हवाली करीत मनप्रीतने गोळाफेकसाठी राष्ट्रीय शिबिर गाठले होते.

Mmmma, it just got settled ... do not come back! | मम्मा, आता बस्स झाले...परत ये ना!

मम्मा, आता बस्स झाले...परत ये ना!

Next

भुवनेश्वर : ज्या वयात बाळाला मातेची नितांत गरज असते अशा वेळी आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हवाली करीत मनप्रीतने गोळाफेकसाठी राष्ट्रीय शिबिर गाठले होते. या शिबिरात प्रशिक्षण घेतानाही तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव होता. अशा अवस्थेतून तिने देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. ‘मम्मा, आता बस्स झाले... परत ये ना..’ अशी मनप्रीतची पाच वर्षीय मुलगी आता तिच्याकडे विनवणी करीत आहे. या विनवणीमुळे ‘गोल्डन गर्ल’ मनप्रीत अत्यंत भावुक होते.
आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक विजेती मनप्रीत एनआयएस पटियाला येथे पती-प्रशिक्षक करमजित सिंह सोबत सराव करीत आहे. तिची मुलगी जसनूर मात्र काही वर्षांपासून तिच्या आजीसोबत आहे. एनआयएसच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मनप्रीत आपल्या मुलीसाठी वेळ देऊ शकत नाही. आपल्या सासूकडूनच तिला मुलीची विचारपूस करावी लागते. आता जसनूर मोठी झाली असून तिला आपल्या आईची अनुपस्थिती जाणवू लागली आहे. आईने सराव सोडून माझ्याकडे परत यावे, अशी केविलवाणी विनंती ती आईला करीत आहे. मनप्रीतने वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जसनूर काही महिन्यांनी सहा वर्षांची होईल. जेव्ही ती १० महिन्यांची होती तेव्हापासून मी ट्रेनिंग सुरू केले. तेव्हापासून सासू सांभाळ करीत आहे. तिची विचारपूस करण्यासाठी मी रोज फोन करते. काही गोष्टी तिला कळत आहेत. आशियाई चॅम्पियनशिप संपल्याचे तिला माहीत आहे. त्यामुळे ती मला परत बोलावतेय. आता खूप झाले, परत ये.. अशी विनवणी ती फोनवरकरते. तिची ही हाक मला व्याकूळ करते. (वृत्तसंस्था)

Web Title: Mmmma, it just got settled ... do not come back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.