मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 07:38 PM2024-06-14T19:38:23+5:302024-06-14T19:38:39+5:30

या स्पर्धेत ५२ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते.

Modern Pentathlon Laser Run World Championships - India got one silver and one bronze medal | मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक

मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक

मुंबई –भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवित मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.‌ ही स्पर्धा झेंगझोऊ, चीन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धेत ५२ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा लहान वयोगट, कनिष्ठ, वरिष्ठ, मास्टर्स अशा एकूण बारा वयोगटात घेण्यात आली. त्यामध्ये वैयक्तिक, सांघिक आणि रिले प्रकारात स्पर्धांचा समावेश होता. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भारताच्या २२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार येथील खेळाडू सहभागी झाले होते. 


एमपीएफआयतर्फे अमरावती येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली. करण मिल्के (महाराष्ट्र), उदेश मजिक (गोवा), आदित्य आनंद (बिहार) यांनी कुमारांच्या सांघिक गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. १९ वर्षाखालील गटात प्रिन्स कुमार (बिहार) आणि अन्नू कुमारी (झारखंड) यांनी मिश्र रिले स्पर्धेत भारतासाठी प्रथमच कांस्यपदक जिंकले.


स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. मॉडर्न पेंटॅथलॉनचे भारतीय प्रशिक्षक वैभव चाफेकर यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि खेळातील बारकावेही शिकवले. प्रत्यक्ष स्पर्धेतही त्यांनी भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन व नेतृत्व केले. आधुनिक पेंटॅथलॉन हा एक ऑलिम्पिक खेळ आहे आणि त्याचे उप-खेळ जगभरात खेळले जातात. हा खेळ अतिशय साहसी असून तो खेळाडूची शारीरिक आणि मानसिक चाचणी घेतो. त्यात पोहणे, इपी फेन्सिंग, अडथळे, धावणे आणि नेमबाजी यांचा समावेश आहे. 

Web Title: Modern Pentathlon Laser Run World Championships - India got one silver and one bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.