क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

By admin | Published: December 13, 2015 02:38 AM2015-12-13T02:38:55+5:302015-12-13T02:38:55+5:30

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर

Modi's smile on the question of cricket | क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

Next

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर, उभय संघांदरम्यान मालिकेचा निर्णय खेळाडू नाही तर सरकार घेईल, असे मत विश्वकप विजेते भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही दिग्गज अष्टपैलू कपिल व इम्रान एका वृत्तवाहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
इम्रान यांनी सांगितले, ‘‘उभय देशांदरम्यान क्रिकेट होणे आवश्यक आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभय देशांदरम्यान क्रिकेट व्हायला पाहिजे, असे म्हटले, त्या वेळी मोदी यांनी केवळ स्मित केले. त्यांचा होकार होता की नकार, हे मला कळाले नाही. मी सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे मी होकारच समजतो.’’
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यात मालिका प्रस्तावित आहे. त्यासाठी उभय देशांच्या बोर्डांची सहमती आहे; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या मालिकेसाठी अद्याप सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडचे स्पष्ट केले, की मालिकेच्या आयोजनासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आम्हाला अद्याप सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.
दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तान तहरिके इन्साफ पार्टीचे अध्यक्ष असलेले इम्रान म्हणाले, ‘‘ज्या वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी पाकिस्तानच्या नागरिकांनाही दु:ख झाले. काही लोकांच्या कृत्यामुळे कुणी पूर्ण देशाची मानसिकता ठरवू शकत नाही. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट खेळणे बंद करणे यावरचा उपाय नाही. आमची संस्कृती एक आहे.’’
इम्रान पुढे म्हणाले, ‘‘मी काही मिळवण्यासाठी राजकारणात
प्रवेश केला नसून काही करण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. मी पंतप्रधान होण्यास इच्छुक नसून लोकांची सेवा करण्यास
प्रयत्नशील आहे.’’(वृत्तसंस्था)

खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत; पण देशाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाहीत. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय देशाचे सरकार घेईल, खेळाडू नाही.
- कपिलदेव,
माजी कर्णधार, भारत

आमचा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याचा प्रयत्न असायचा; पण चाहत्यांची गर्दी बघितल्यानंतर आमच्यावर दडपण येत होते. पराभव स्वीकारावा लागला, तरी कठीण होत असे. एक वेळ कोलकात्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळी कुणी जागे राहणार नाही, याची खबरदारी घेत पाकिस्तानमध्ये दाखल झालो होतो.
- इम्रान खान

Web Title: Modi's smile on the question of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.