मोहंमद, अमृता, धर्मेंद्र प्रथम

By admin | Published: January 11, 2016 03:12 AM2016-01-11T03:12:57+5:302016-01-11T03:12:57+5:30

मोहंमद मिराज, अमृता पटेल, धर्मेंद्र यादव व कविता यादव यांनी पुणे महापौर चषक राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आपापल्या वयोगटांत प्रथम क्रमांक मिळविला.

Mohammed, Amrita, Dharmendra First | मोहंमद, अमृता, धर्मेंद्र प्रथम

मोहंमद, अमृता, धर्मेंद्र प्रथम

Next

पुणे : मोहंमद मिराज, अमृता पटेल, धर्मेंद्र यादव व कविता यादव यांनी पुणे महापौर चषक राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आपापल्या वयोगटांत प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्राच्या पूनम सोनुणेला रौप्य, तर सायली मेंगेला कांस्यवर समाधान मानवे लागले.
महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या १६ वर्षांखालील गटातील २ किलोमीटरची शर्यत चुरशीची झाली. दिल्लीच्या मोहंमद मिराजने उत्तर प्रदेशाच्या संदीपकुमारला शेवटच्या २० मीटरमध्ये मागे टाकून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात २ किलोमीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या पूनम सोनुणेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशची अमृता पटेल व पूनम यांच्यामध्ये शेवटच्या ५० मीटरमध्ये चुरस झाली; पण पूनम अमृताला गाठू शकली नाही. पूनमने ही शर्यत ६ मिनिटे ४६.९ सेकंदांत पूर्ण केली. १८ वर्षांखालील मुलींच्या ४ किलोमीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या सायली मेंगेने १५ मिनिटे १८.७ सेकंदांत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक जिंकले. (क्रीडा प्रतिनिधी)
मुले - १८ वर्षांखालील - ६. कि .मी. : धर्मेंद्र यादव (यू.पी. १९ मिनिटे ०९.३ से.), राकेश कुमार यादव (यू.पी. १९ मिनिटे १६.४ से.), सावन बरवाल (हिमाचल प्रदेश १९ मिनिटे २०.३ से.), नझीम पी. (केरळ १९ मिनिटे ५५.० से.), शिरीन जोस, (केरळ १९ मिनिटे ५६.० सेकंद), बहादूर पटेल (दिल्ली २० मिनिटे ३२. ९ से.); मुले १६ वर्षांखालील २ कि.मी. : मोहंमद मिराज (दिल्ली ५ मिनिटे ५९.१ से.), संदीप कुमार (यू.पी. ५ मिनिटे ५९.६ से.), अतुल पुनिया (राजस्थान ५:५९.७ से.), मुकेश यादव (बिहार ५ मिनिटे ५९.९ सें.), प्रदीप कुमार (राजस्थान ६ मिनिटे ०४.१ से), सुभ्भिर (हरियाणा ६ मिनिटे ०४.३ से.);
मुली १८ वर्षांखालील ४ कि.मी. : कविता यादव (यू.पी. १४ मिनिटे ३७.४ से.), सविता पाल (यू.पी. १४ मिनिटे ५५ से.), सायली मेंगे (महाराष्ट्र १५ मिनिटे १८. ७ से.) स्वाती वनवाडे (महाराष्ट्र १६.००.१ से.), उषा शर्मा (हरियाणा, १६ मिनिटे ०७.० से.), नुझाहत उस्मान (उत्तराखंड १६ मिनिटे १३.० से.);
मुली १६ वर्षांखालील २ कि .मी. : अमृता पटेल (यू.पी. ६ मिनिटे ३९.२ से.), पूनम सोनुणे (महाराष्ट्र ६ मिनिटे ४६.९ से.), अनिता थॉमस (केरळ ७ मिनिटे १७.५ से), मधू (पंजाब ७ मिनिटे २८.१ से), गायत्री जी. (केरळ ७ मिनिटे ३७.१ से.), सुप्रिया मुंडा (पं. बंगाल ७ मिनिटे ४०.४ से).

Web Title: Mohammed, Amrita, Dharmendra First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.