मोहंमद हाफीज चाचणीत नापास
By admin | Published: January 5, 2015 03:18 AM2015-01-05T03:18:05+5:302015-01-05T03:18:05+5:30
पाकिस्तानसमोर अडचणींचा डोंगर वाढतच जात असून, आता त्यांचा अष्टपैलू खेळाडू मोहंमद हाफीज हा गेल्या आठवड्यात चेन्नईत गोलंदाजी केंद्रात
कराची : पाकिस्तानसमोर अडचणींचा डोंगर वाढतच जात असून, आता त्यांचा अष्टपैलू खेळाडू मोहंमद हाफीज हा गेल्या आठवड्यात चेन्नईत गोलंदाजी केंद्रात झालेल्या बायो मेकॅनिक परीक्षणात नापास झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) त्याला अधिकृत कसोटीसाठी संघात स्थान देऊ शकत नाही.
हाफीजने चेन्नईच्या रामचंद्र विश्वविद्यालयात गोलंदाजी अनौपचारिक परीक्षणादरम्यान ११ चेंडू टाकले, त्यातील ६ मध्ये त्याच्या हाताचा कोपरा १५ अंशांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वळत होता. विशेष म्हणजे त्याने टाकलेल्या सहा चेंडूंत हाताचा कोपरा सरासरी १६ अंशांपेक्षा जास्त वळत होता. त्याने राऊंड द विकेट गोलंदाजी टाकली, तेव्हा त्याने टाकलेल्या दोन चेंडूंत त्याच्या हाताचा कोपरा १७ आणि १९ अंशांत वळाला.