सेव्ह गाझा बँड मैदानावर वापरण्यास मोईल अलीला आयसीसीची बंदी

By admin | Published: July 29, 2014 10:43 AM2014-07-29T10:43:13+5:302014-07-29T17:14:18+5:30

भारताविरुद्धच्या तिस-या कसोटीत गाझा आणि पॅलेस्टाइनचे समर्थन करणारा रिस्ट बँड घालण्यास इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली यास आयसीसीने मनाई केली आहे.

Mole Ali ICC ban on use at Save Gaza Stadium | सेव्ह गाझा बँड मैदानावर वापरण्यास मोईल अलीला आयसीसीची बंदी

सेव्ह गाझा बँड मैदानावर वापरण्यास मोईल अलीला आयसीसीची बंदी

Next

ऑनलाइन टीम

साउथम्पटन, दि. २९ - भारताविरुद्धच्या तिस-या कसोटीत गाझा आणि पॅलेस्टाइनचे समर्थन करणारा रिस्ट बँड घालण्यास इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली यास आयसीसीने मनाई केली आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात दुस-या दिवशी सेव्ह गाझा हा इस्त्रायलला विरोध करणारा बँड अलीने मनगटावर बांधल्याचे दिसून आले होते. त्याने हा प्रकार मानवतावादी दृष्टीकोनातून असल्याचे आणि त्याचा काहीही राजकीय संबंध नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले होते. परंतु हा प्रकार आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे सांगत आयसीसीने अलीला सदर बँड घालण्यास बंदी केली आहे.
साउथम्पटन येथे सुरु असलेल्या कसोटीच्या दुस-या दिवशी इंग्लंडचा खेळाडू मोईन अली हा हातात एक बँड घालून मैदानात उतरला होता. या बँडवर सेव्ह गाझा, फ्री पॅलेस्टाइन असा संदेश लिहीण्यात आला होता. आयसीसीच्या नियमानुसार कोणताही खेळाडू आयसीसीची परवानगी घेतल्याशिवाय संदेश देणारे बँड, कपडे किंवा अन्य कोणत्याही वस्तू घेऊन मैदानात उतरु शकत नाही. मोईन अलीने पॅलेस्टाइनला स्वतंत्र करण्याची मागणी करणारा बँड घालताना आयसीसी किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवानगी घेतली नव्हती. मैदानात कोणताही खेळाडू राजकीय, धार्मिक आणि वंशभेदाशी संबंधीत संदेश देऊ शकत नाही असेही आयसीसीच्या आचारसंहितेमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आयसीसीने या घटनेची गंभीर दखल घेत अलीविरोधात चौकशी समिती नेमली होती. 
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मात्र मोईन अलीची पाठराखण केली आहे. मोईन अलीने गाझाविषयी बँड घालण्यामागे राजकीय उद्देश नसून केवळ मानवतावादी दृष्टीकोनातूनच त्याने हे बँड वापरले असे बोर्डाने म्हटले आहे.

 

 

Web Title: Mole Ali ICC ban on use at Save Gaza Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.