रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे १०० पेक्षा जास्त खेळाडू पात्र
By admin | Published: June 26, 2016 05:39 PM2016-06-26T17:39:07+5:302016-06-26T17:39:07+5:30
भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले. रियोसाठी अॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या आता २३ तर एकूण भारतीय खेळाडूंची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे.
पोलिश अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोहम्मद अनिसने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.४० सेकंदांची वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रिया ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अनिसने राजीव अरोकियाने नोंदविलेला ४५.४७ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. कझाकिस्तान येथील अलमाटीमध्ये झालेल्या २६ व्या कोसनोव्ह मेमोरियल स्पर्धेत ओरिसाच्या शार्बनी नंदाने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदविली.
दुसरीकडे राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशच्या अंकित शर्माने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.१७ मीटरचे अंतर कापून रियोसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय आर्चरी असोसिशनच्या वतीने बंगळुरू येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पश्चिम बंगालचा २४ वर्षीय अनातू दासने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात रियो ऑलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.