कोहली, रहाणेवर अधिक लक्ष!
By admin | Published: March 16, 2017 01:18 AM2017-03-16T01:18:05+5:302017-03-16T01:18:05+5:30
खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल
- हर्षा भोगले लिहितो..
खेळपट्टीचा कुणाला किती उपयोग होतो, हे मला अद्याप कळलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीचे सुरुवातीपासूनचे स्वरूप कसे असेल, हे जाणून घेण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत झाली आहे.
आॅस्ट्रेलियन संघ खेळपट्टीबाबत दिवसागणिक डावपेच ठरवित जाईल, असे दिसते. असे झाले तरी भारताने काळजी करण्याचे कारण नाही. कारण जेव्हा तुम्ही नकारात्मकता वापरता तेव्हा लहान लहान तथ्याच्या मागे
जात असता. एखादा संघ
वाईटाच्या मागे लागला असेल तर त्याची परिणती देखील तितकीच वाईट होते, हे सत्य आहे.
मालिकेत १-१ अशी बरोबरी असली तरी बंगळुरूच्या विजयासोबत भारत आॅस्ट्रेलियावर वरचढ ठरला. बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्यासाठी आॅस्ट्रेलियाला एक विजय हवा असेल तर भारताला दोन विजयांची गरज आहे. भारतीय संघ तरीही निर्धास्त आहे. तिसऱ्या कसोटीत दोन किंवा त्याहून अधिक फिरकी गोलंदाज खेळवायचे की नाही हा एकच प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. रांचीची खेळपट्टी भरपूर वळण घेऊ शकते, असा भारताला विश्वास असेल तर संघात सहाव्या स्थानावर खेळणारा अतिरिक्त फलंदाज संघात घेणे चांगली कल्पना असेल. दुसरीकडे फार काळ क्षेत्ररक्षण करावे लागू शकते, असे वाटत असेल तर अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविणे सोयीचे होणार आहे. दहा खेळाडू निवडणे सोपे होते तेव्हा संघात चांगली भावना आहे, याची खात्री पटते.
भारताने मालिकेला सुरुवात करण्याआधी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चांगले कसोटी फलंदाज म्हणून गाजत होते. कोहली चारही डावांत अद्यापही स्थिरावला नाही. पण रहाणेने मात्र बंगळुरूत विजयी भागीदारी करीत फॉर्म गवसल्याची झलक दिली आहे. तरीही या दोन फलंदाजांच्या खेळावर माझी नजर असेल. आश्विनने बंगळुरूत सहा गडी बाद करीत स्वत:मध्ये उत्साह भरला. नंबर वन गोलंदाज फॉर्ममध्ये असेल तर प्रतिस्पर्धी संघाला चित करण्यात मजा येते. मागच्या सामन्यात अन्य गोलंदाजही ‘क्लिक’ झाल, ही कर्णधारासाठी जमेची बाजू ठरावी. जेव्हा गोलंदाज चांगला मारा करतो, तेव्हा चेंडू वारंवार मिळावा, असा त्याचा प्रयत्न असतो. पण भारताच्या चारही गोलंदाजांना संधी मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. भारत तिसऱ्या कसोटीत फेव्हरिट मानला जात आहे; पण आॅस्ट्रेलियाने सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळविल्यास त्यांना देखील विजयाची संधी राहील.