नव्या खेळांकडे अधिक कल
By admin | Published: August 29, 2015 01:03 AM2015-08-29T01:03:02+5:302015-08-29T01:03:02+5:30
Next
>सोलापूर: 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय़ त्यानिमित्त सोलापूर जिलच्या क्रीडा विकासावर घेतलेला एक आढावा़़़29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिऩानिमित्त़़़शालेय शहर आणि जिल्हापातळीवर नव्याने समावेश करण्यात आलेल्या 70 क्रीडा प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच संभ्रावस्था निर्माण झाली असणाऱ कारण इनडोअर आणि सोप्या खेळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आह़े कुस्ती, कबड्डी,खो-खो सारखे दमदार र्मदांनी खेळ मागे पडत आहेत़ सध्याच्या परिस्थितीत खेळाकडे पाहण्याचा विद्यार्थी, प्रशिक्षक, संघटक, खेळाडूंचा कल बदलत चालला आह़े खेळ वाढत आहेत़ पण खेळाचा विकास खर्या अर्थाने होत आहे काय याचाही विचार करायला हव़े क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल सारख्या खेळामध्ये जिलची भरीव कामगिरी राहिलेली आह़े याशिवाय रायफल शूटिंगमध्येदेखील गेल्या दोन तीन वर्षांत खेळाडूंनी उत्तुंग झेप घेतली आह़े रोजचा सराव महत्त्वाचा- योगेश इंडी कोणत्याही खेळामध्ये रोजचा सराव आवश्यक असतो़ सातत्यपणा राखल्यास यश हमखास येतो़ हल्लीच्या नववनीन खेळामुळे विद्यार्थ्यांचा कल सोप्या खेळाकडे वळल्याचे दिसून येत आह़ेखेळाडूमध्ये जिद्द हवी- अनिल गिरामएखाद्या खेळात पारंगत व्हावयाचे असेल तर खेळाडूमध्ये भरपूर आत्मविश्वास आणि जिद्द असायला हव़े कोणताही खेळ असो तो मनापासून अंगिकारायला हवा़ मनापासून केलेल्या कामाला यश नक्की मिळतो़मोठय़ा क्रीडांगणाची गरज- सुहास छंचुरेसध्या अनेक नवनवीन खेळ आले आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी अथवा सरावासाठी आता मोठय़ा क्रीडांगणाची गरज भासणार आह़े शाळा, संघटना, संस्थांनी विद्यार्थ्यासाठी मैदाने उपलब्ध करून दिली पाहिजेत़खेळामुळे व्यक्तीमत्व विकास- चóोश इंडीखेळामुळे मानसिक आणि शारीरिक विकास होतो़ खेळामुळे लोकप्रियता वाढत़े जीवनात काही तरी करून दाखवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरवले पाहिजेत़ त्यामुळे कला गुणांना वाव मिळतो़क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- धनंजय धेंडेग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मजल मारली आह़े यामध्ये क्रीडा शिक्षकांपासून ते क्रीडा संघटक, संस्था, क्रीडा संघटनांचा महत्त्वाचा वाटा आह़े