एकदिवसीय सामन्यात या देशांनी बनवल्या आहेत सर्वात जास्त धावा

By admin | Published: August 21, 2016 04:00 PM2016-08-21T16:00:03+5:302016-08-21T19:40:44+5:30

१९७१ पासून कोणत्या संघाने किती धावा केल्या हे पाहिल्यास अनेक मनोरंजनक माहिती आणि आकडेवारी समोर येते. सर्वाधिक धावा केलेल्या टॉप १० टीम्सचा हा थोडक्यात आढावा.

The most runs scored by these countries in ODIs | एकदिवसीय सामन्यात या देशांनी बनवल्या आहेत सर्वात जास्त धावा

एकदिवसीय सामन्यात या देशांनी बनवल्या आहेत सर्वात जास्त धावा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ : क्रिकेटच्या इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला होता. सुरुवातीच्या काळात एकदिवसीय क्रिकेट सामने ६०-६० ओव्हर चे खेळवले जायचे. काही कालावधीनंतर षटकांची
संख्या ५० ओव्हर करण्यात आली. कालानुरूप या क्रीडाप्रकारात अनेक बदल कारण्यात आले आहेत.एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (१८,४२६) आणि सर्वाधिक शतकांचा (४९) विक्रम आपल्या लाडक्या तेंडल्या म्हणजेच सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. या सर्वात अगदी सुरवातीपासून म्हणजेच १९७१ पासून कोणत्या संघाने किती धावा केल्या हे पाहिल्यास अनेक मनोरंजनक माहिती आणि आकडेवारी समोर येते. सर्वाधिक धावा केलेल्या टॉप १० टीम्सचा हा थोडक्यात आढावा.

१०. बांगलादेश 

सर्वाधिक धावांचा विचार केल्यास १० क्रमांकावर बांगलादेश चा क्रमांक लागतो. बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना १९८६ खेळाला होता. आजपर्यंत  बांगलादेश ने एकूण ३१२ एकदिवसीय सामने खेळले असून ९८ सामन्यांत विजय तर २१० सामन्यांत पराजयाचा सामना करावा लागला आहे. बांग्लादेशच्या नावावर ६०,३९१ धावा आहेत. २४. २९ च्या ऍव्हरेज ने बांग्लादेशने या धावा बनवलेल्या आहेत.

९. झिम्बाब्वे

झिम्बाब्वेचा क्रमांक सर्वाधिक धावा केलेल्या संघांमध्ये ९ वा असून सुमारे ९६,०८२ धावा या संघाच्या नावावर आहेत. १९८३ साली झिम्बाब्वेने आपला  पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या संघाने आजपर्यंत एकूण ४७४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यातील १२२ सामने जिकंले आहेत तर ३३७ सामने हरले आहेत. 

८. दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिका या आकडेवारीत आठव्या स्थानावर येते. अपर्थाइडच्या कारणासाठी दक्षिण आफ्रिका संघाला १९७० ते १९९१ या कालावधीत क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. परंतु १९९१ पासून या संघाने ५५८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांत मिळून दक्षिण आफ्रिकने केलेल्या धावांची संख्या १,२६,१२६ इतकी असून ऍव्हरेज ३५.२५ आहे. हे सर्वोत्तम ऍव्हरेज आहे. या धावा ५.०४ च्या रनरेट ने केल्या असून हा इतर संघाच्या तुलनेत सर्वोत्तम रनरेट आहे.

७. इंग्लंड

इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये खेळला होता. तेंव्हापासून आजपर्यंत या संघाने ६६९ सामन्यांत २९.९९ च्या ऍव्हरेज ने एकूण १,४२,९६६ धावा केल्या आहेत. यात ३२२ सामने जिकंले आहेत तर ३१६ सामन्यात प्रभावाला सामोरे जावे लागले आहे.

६. न्युझीलँड

१९७१ साली न्युझीलँडने पहिला एकदिवसीय सामना खेळाला होता. १९७१ पासून आत्तापर्यंत न्युझीलँडने १,४५,१२९ धावांसह एकूण ७०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ३११ सामने जिकंले आहेत तर ३४८ सामने हारले आहेत.

५. वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज संघाने १९७३ मध्ये आपला पहिलावहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या देशाने सुरुवातीच्या काळात सुमारे दशकभर या खेळावरअधिराज्य केले  आहे. वेस्ट इंडिजला या खेळात जगज्जेता होण्याचा मान दोन (१९७५ आणि १९७९) वेळा मिळालेला आहे. या संघाने एकूण ७४१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात सुमारे १,५३,५१३ धावा केल्या आहेत. या दरम्यान ३७६ सामन्यांत विजय तर ३३३ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे.

४. श्रीलंका

श्रीलंकाने पहिला एकदिवसीय सामना १९७५ मध्ये खेळला होता. आजपर्यंत श्रीलंकाने एकूण ७७२ एकदिवसीय सामने खेळले असून ३६४ सामन्यांत विजय तर ३६९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेच्या नावावर २९.७१ च्या ऍव्हरेज ने १,६३,५०९ धावा आहेत.

३. पाकिस्तान

पाकिस्तानने १९७३ साली आपला पहिला एकदिवसीय खेळाला होता. आजपर्यंत पाकिस्तानने एकूण ८५७ एकदिवसीय सामने खेळले असून ४५२ सामन्यांत विजय तर ३७९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या नावावर १,८४,४८२ धावा आहेत. ३०.१० च्या ऍव्हरेज ने पाकिस्तान ने या धावा बनवलेल्या आहेत.

२. ऑस्ट्रेलिया

सर्वाधिक धावांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर येते. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत या संघाने एकूण ८७७ एकदिवसीय सामने खेळले असून ४५२ सामन्यांत विजय तर ३७९ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाने ३०.०९ च्या ऍव्हरेज ने सुमारे १,९५,८८३ इतक्या धावा केल्या आहेत.

१. भारत

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याऱ्या देशांच्या यादीत भारत अग्रस्थानी आहे. भारताने आपला पहिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला होता. भारताने १९७३ पासून आजपर्यंत एकूण ८९९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३२.७९ च्या ऍव्हरेज ने १,९६,८१४ धावा काढल्या आहेत. खेळलेल्या ८९९ सामन्यांपैकी भारताला ३९९ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे
लागले आहे तर ४५४ सामन्यांत विजय संपादन केला आहे.

Web Title: The most runs scored by these countries in ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.