बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
By admin | Published: September 21, 2016 12:56 PM2016-09-21T12:56:51+5:302016-09-21T13:40:36+5:30
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी भारताचे माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज एमएसके प्रसाद यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी भारताचे माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज एमएसके प्रसाद यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एमएसके प्रसाद संदीप पाटील यांच्याकडून पदभार संभाळणार आहेत.
देवांग गांधी, गगन खोडा, शरणदीप सिंग आणि जतीन परांजपे हे निवड समितीचे नवीन सदस्य आहेत. अजय शिर्के यांचीही बिनविरोध बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली. जुलै महिन्यात अनुराग ठाकूर यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी अजय शिर्के यांची सचिवपदी निवड झाली होती.
शशांक मनोहर यांची आयसीसी चेअरमनपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुराग ठाकूर आले. एमएसके प्रसाद यांची अध्यक्षपदी झालेली निवड हा आश्चर्यकारक आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही.
त्यांनी सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते ९६ फर्स्ट क्लासचे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकांमध्ये अनुराग ठाकूरच भारतीय बोर्डाचे प्रतिनिधीत्व करतील असा निर्णय घेण्यात आला.