एमएसएम, स्वाभिमान क्रीडा मंडळ विजयी

By Admin | Published: February 20, 2016 12:34 AM2016-02-20T00:34:54+5:302016-02-20T00:34:54+5:30

औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरनॅशनलचा ३२ वि. १३ बास्केटने सहज पराभव केला. १७ वर्षांखालील गटात औरंगाबाद सेंट्रल संघाने सेंट फ्रान्सिसचा ४४ वि. ३९ बास्केटने पराभव केला, तर एम.एस.एम.ने द जैन इंटरनॅशनल शाळेवर ६१ वि. १७ बास्केटने विजय मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन नीलेश पहाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मकरंद जोशी, गणेश कड, प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, राजू कणिसे, पंकज परदेशी, गणेश तुपे, समाधान बेलकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत १९ संघांनी सहभाग नोंदवला.

MSM, Swabhiman Sports Board won | एमएसएम, स्वाभिमान क्रीडा मंडळ विजयी

एमएसएम, स्वाभिमान क्रीडा मंडळ विजयी

googlenewsNext
ंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरनॅशनलचा ३२ वि. १३ बास्केटने सहज पराभव केला. १७ वर्षांखालील गटात औरंगाबाद सेंट्रल संघाने सेंट फ्रान्सिसचा ४४ वि. ३९ बास्केटने पराभव केला, तर एम.एस.एम.ने द जैन इंटरनॅशनल शाळेवर ६१ वि. १७ बास्केटने विजय मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन नीलेश पहाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मकरंद जोशी, गणेश कड, प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, राजू कणिसे, पंकज परदेशी, गणेश तुपे, समाधान बेलकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत १९ संघांनी सहभाग नोंदवला.

Web Title: MSM, Swabhiman Sports Board won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.