मुगुरुजा फ्रेंच ओपन चॅम्पियन

By admin | Published: June 5, 2016 12:25 AM2016-06-05T00:25:44+5:302016-06-05T00:25:44+5:30

गरबाईन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित आणि गतचॅम्पियन सेरेना विलियम्सचा ७-५, ६-४ असा पराभव करीत शनिवारी येथे आपल्या

Mughuruza French Open champion | मुगुरुजा फ्रेंच ओपन चॅम्पियन

मुगुरुजा फ्रेंच ओपन चॅम्पियन

Next

पॅरिस : गरबाईन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित आणि गतचॅम्पियन सेरेना विलियम्सचा ७-५, ६-४ असा पराभव करीत शनिवारी येथे आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या विजयाबरोबरच चौथ्या मानांकित मुगुरुजाने जगातील नंबर वन सेरेनाला विक्रमाची बरोबरी करणाऱ्या २२व्या मोठ्या विजेतेपदापासून वंचित ठेवले. २२ वर्षीय मुगुरुजा १९९८ नंतर अरांत्सा सँचेज विकारियोनंतर पॅरिसमध्ये महिला चॅम्पियन बनणारी पहिली स्पेनची खेळाडू ठरली. विशेष म्हणजे प्रथमच मोठ्या स्पर्धेत फायनल गाठून विजेतेपद पटकावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याआधी फ्लाविया पेनेटाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकली, तर एंजेलिक कर्बरने यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.
दुसरीकडे सेरेनाला सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि स्टेफी ग्राफच्या १९६८नंतर ओपन युगाचा २२ एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेनाला आता कमीतकमी विम्बल्डनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विम्बल्डनमध्ये ती गत चॅम्पियन असून याआधी तिने सहा वेळेस विजेतेपद पटकावले आहे.
मुगुरुजासाठी फायनलचा प्रवास खूप सुकर ठरला आणि तिने यादरम्यान फक्त एका सामन्यामध्ये एक सेट गमावला, तर सेरेनाला उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यफेरीत विजय मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सेटमध्ये सावध सुरुवात करताना २-२ अशी बरोबरी साधली. सेरेनाने नंतर दुहेरी चूक करून आपली सर्व्हिस गमावली आणि मुगुरुजाने ४-२ अशी आघाडी घेतली.

Web Title: Mughuruza French Open champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.