मुगुरुजा चॅम्पियन

By admin | Published: July 16, 2017 02:07 AM2017-07-16T02:07:53+5:302017-07-16T02:07:53+5:30

स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिने शनिवारी येथे सेंटर कोर्टवर पाच वेळेसची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा सहज ७-५, ६-0 असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना विम्बल्डन

Muguruaja Champion | मुगुरुजा चॅम्पियन

मुगुरुजा चॅम्पियन

Next

लंडन : स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिने शनिवारी येथे सेंटर कोर्टवर पाच वेळेसची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा सहज ७-५, ६-0 असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना विम्बल्डन महिला एकेरीचे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले.
मुगुरुजाने सुरेख खेळ करताना व्हीनसचा ७७ मिनिटांत पराभव करताना इतिहास रचण्याच्या तिच्या अपेक्षांवर पाणी फेरले आणि अशा प्रकारे ती विम्बल्डन जिंकणारी दुसरी स्पेनिश खेळाडू ठरली. ती दोन वर्षांपूर्वी पहिल्या विम्बल्डन फायनलमध्ये व्हीनसची बहीण सेरेनाकडून पराभूत झाली होती.
मुगुरुजाची विद्यमान प्रशिक्षक कोचिंता मार्टिनेज हिने १९९४ मध्ये विम्बल्डनमध्ये स्पेनचा झेंडा फडकावला होता. त्या वेळेस तिने फायनलमध्ये मार्टिना नवरातिलोवा हिचा पराभव केला होता. या २३ वर्षीय खेळाडूने विजयानंतर म्हटले, ‘‘पहिला सेट कठीण होता. आम्हा दोघींनाही संधी होती; परंतु मिळालेल्या संधीचा फायदा घेतल्याने मी खुश आहे. दोन वर्षांआधी मी सेरेनाविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाले होते आणि त्या वेळेस तिने एक दिवस मी विजेतेपद पटकावेल असे सांगितले होते. आज अखेर हे सिद्ध झाले.’’ व्हेनेजुएला येथे जन्मलेल्या मुगुरुजा हिने गेल्या वर्षी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिने अशा प्रकारे व्हीनसचा ओपन युगातील सर्वात वयस्कर विम्बल्डन चॅम्पियन्सचा प्रयत्न फोल ठरवला. व्हीनसने आठ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. तिला सहाव्यांदा आॅल इंग्लंड क्लब विजेतेपद जिंकण्याची आशा होती. तिने नऊ वर्षांआधी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. १० व्या मानांकित ३७ वर्षीय व्हीनसने याआधी २०००, २००१, २००५, २००७ आणि २००८ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे.
शनिवारी अंतिम फेरीतील पहिला सेट संघर्षपूर्ण ठरला. प्रत्येक गुणासाठी दोन्ही प्रतिस्पर्धींनी एकमेकांना चांगली झुंज दिली. दोघींची पहिल्या सेटमध्ये ४-४, ५-५ अशी बरोबरी होती. अखेर टायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेला हा सेट मुगुरुजाने ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मुगुरुजा हिचेच वर्चस्व राहिले व तिने दुसरा सेट ६-० असा सहज जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Muguruaja Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.