खेळाडूंना मिळणार रोख पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:13 AM2018-01-09T00:13:22+5:302018-01-09T00:14:30+5:30
केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- शिवाजी गोरे
पुणे : केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खेळाडूंना पुरस्कार देण्यात राज्य शासन राजकारण करीत असल्याची टीका क्रीडाविश्वातून झाली होती. त्यामुळे सोमवारी तातडीने याबाबतचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला.
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील, असे या आदेशात म्हटले आहे. त्यासाठी वेगळा आदेशाची गरज नसल्याने खेळाडूंना पुरस्कारासाठी शासनाकडे हात पसरावे लागणार नाहीत.
- राष्ट्रीय स्पर्धेनंतर त्याची माहिती संबंधित राज्य संघटनेने पदकप्राप्तीच्या प्रमाणपत्रासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे १५ दिवसांत पाठवावी.
- ०9 कोटी रुपयांची रोख रक्कम राज्य सरकार खेळाडूंना देणार आहे
काय असतील बक्षिसे
सुवर्णपदक विजेत्याला रोख ५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला ५० हजार
रौप्यपदक विजेत्याला ३ लाख व त्यांच्या मार्गदर्शकाला ३० हजार
कांस्यपदक विजेत्याला १.५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला २० हजार अशी पुरस्काराची रक्कम राहील.