मल्टी स्क्रीन मीडिया चॅम्पियन

By admin | Published: February 4, 2015 02:51 AM2015-02-04T02:51:57+5:302015-02-04T02:51:57+5:30

मल्टी स्क्रीन मीडियाने सियाराय पोदार ग्रुपवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी- २० क्रिकेट स्पर्धेच्या ‘ई’ डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले.

Multi Screen Media Champion | मल्टी स्क्रीन मीडिया चॅम्पियन

मल्टी स्क्रीन मीडिया चॅम्पियन

Next

मुंबई : मल्टी स्क्रीन मीडियाने सियाराय पोदार ग्रुपवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी- २० क्रिकेट स्पर्धेच्या ‘ई’ डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत सियाराम पोदारने नाणेफेक जिंकून मल्टी स्क्रीन मीडियाला प्रथम फलंदाजी दिली; पण हा निर्णय त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटला. विपिनने ५६ चेंडूंतच ७५ धावांची दणकेबाज सलामी दिली. चौरसियाने ३७ चेंडूंतच सहा चौकार व दोन षटकारांसह ५९ धावा केल्या. नंतर आलेल्या विशाल पांडे (३०), अमेय जाधव (ना. ३६) व प्रथमेश राऊळ (ना. २०) यांनीही धावांचा वेग कायम राखल्याने निर्धारित २० षटक ांत त्यांनी ३ बाद १७१ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सियाराम पोदारला मध्यमगती गोलंदाज अजय सिंग, अनिरुद्ध जाधव (९/२) यांनी सुरुवातीलाच धक्के दिल्याने त्यांचा निम्मा संघ ३२ धावांतच तंबूत परतला होता. त्यानंतर तुषार झवेरी (३३) व मोहित अवस्थी (३३) यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागी रचली. मात्र संघाचा पराभव टाळण्यासाठी ती पुरेशी नव्हती.
ओंकार गांगणने १५ धावांत २ बळी मिळवत संघाच्या यशात खारीचा वाटा उचलला. चौरसियाची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. विजेत्या संघाला दोन लाखांचे तर उपविजेत्यांना दीड लाखाचे इनाम मिळाले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Multi Screen Media Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.