मुंबई ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?

By admin | Published: February 25, 2016 05:11 PM2016-02-25T17:11:25+5:302016-02-25T17:11:25+5:30

धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे

Mumbai 41st Ranji player to be named? | मुंबई ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?

मुंबई ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि २५ - धवल कुलकर्णीचे ५ बळी आणि श्रीकांत अय्यरच्या ११७ धावांच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्रावर दुसऱ्या दिवसाखेर १५ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईचे ४ फलंदाज अजून बाकी आहेत. दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५० धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या लाड आणि कुलकर्णी मैदानावर आहेत. सौराष्ट्राच्या २३५ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात थोडी अडखळतच झाली २२ धावातं २ फलंदाज गमावले. त्यानंतर सुर्यकुमार यादव (४४) आणि श्रीकांत अय्यर (११७) मुंबईला आघाडी मिळवून दिली. 
 
धवल कुलकर्णीच्या (४२ धावांत ५ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला पहिल्या डावात २३५ धावांत रोखण्याची कामगिरी केली. सौराष्ट्राकडून अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने ६६ अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला.  
 
 
त्यापुर्वी, 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवून सौराष्ट्रावर वर्चस्व मिळविले. धवल कुलकर्णीने सातव्या षटकात अवी बारोत याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून पहिला झटका दिला. पुढच्या षटकात शार्दूल ठाकूरने दुसरा सलामीचा फलंदाज सागर जोगियानीला आदित्य तारे याच्याकरवी झेलबाद करून दुसरा झटका दिला. सौराष्ट्राची सलामीची जोडी २२ धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला (४) कुलकर्णीने सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ३६ धावांवर तिसरा बळी टिपला. त्यानंतर आलेला शेल्डन जॅक्सन भोपळाही फोडू शकला नाही.
 
त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. जयदेव शहा (१३), चिराग जैन (१३), दीपक पुनिया (६) हे झटपट बाद झाले. कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी पाठोपाठ धक्के दिले. अभिषेक नायर व बलविंदर संधू यांनीदेखील प्रत्येकी १ बळी घेऊन त्यांना साथ दिली. सौराष्ट्राचे ७ फलंदाज १०८ धावांतच तंबूत परतले. तर, संघाचा धावफलक शंभरीवर जाण्यासाठी ५०व्या षटकाची वाट पाहावी लागली.
 
अर्पित वासवदा व नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रेरक मंकड यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरला. वासवदाने ६ चौकारांच्या साह्याने २१४ चेंडूंत ७७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. वासवदा-मंकड ही जोडी जमलेली असताना कुलकर्णीने दिवसाच्या शेवटच्या षटकात वासवदाला यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली व संघाला आठवा धक्का दिला. 
(क्रीडा प्रतिनिधी)
 
धावफलक :
सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्वबाद २३५, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड ६६, धवल कुलकर्णी ५/३२, शार्दूल ठाकूर ३/८९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१.
मुंबई पहिला डाव ; 63.2 षटकांत 5 बाद २५०, सुर्यकुमार यादव ४४ आणि श्रीकांत अय्यर ११७, लाड नाबाद २० , कुलकर्णी नाबाद १ खेळत आहेत , जयदेव उनाडकद  २/५५

Web Title: Mumbai 41st Ranji player to be named?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.