तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

By admin | Published: January 1, 2017 01:09 AM2017-01-01T01:09:19+5:302017-01-01T01:09:19+5:30

४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Mumbai challenge before Tamil Nadu | तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

Next

राजकोट : ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उभय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडूने विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत कर्नाटकचा केवळ दोन दिवसांमध्ये पराभव केला तर मुंबईने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादची झुंज ३० धावांनी मोडून काढली. मुंबई संघाला विजय मिळवताना पाचव्या व अखेरच्या दिवशी घाम गाळावा लागला होता.
नवे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या विजयामुळे तामिळनाडू संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. २८ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरलेल्या तामिळनाडू संघाने स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन व मुरली विजय यांच्याविना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश राहुल व करुण नायर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पराभव केला. स्पर्धेतील चमकदार कामगिरी बघता मुंबई संघाला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, पण त्यांना तामिळनाडू रोखण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. उभय संघांदरम्यान आॅक्टोबर महिन्यात साखळी फेरीत लढत झाली होती. त्यात मुंबई संघाने लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत तीन दिवसांमध्ये दोन विकेटने विजय मिळवला होता. आॅक्टोबरनंतर मुंबई संघात बराच बदल झाला आहे. लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत धवल कुलकर्णीने १० बळी घेतले होते, पण आता त्याचा अखिल हेरवाडकर व शुभम रांजणे यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbai challenge before Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.