मुंबई जिल्हा खोखो स्पर्धा : समर्थ, विद्यार्थी, ओम समर्थ व विजय क्लब उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:29 PM2018-10-30T20:29:02+5:302018-10-30T20:29:28+5:30
उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात विजय क्लब दादरच्या संघाने अमर हिंद मंडळाच्या ४ गुणांनी पराभव केला.
मुंबई : मुंबई जिल्हा कुमार मुली गट अजिंक्यपद खोखो स्पर्धेत आज झालेल्या कुमार गटाच्या पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादरच्या संघाने सरस्वती स्पोर्ट्स क्लब याचा (८-६-१०-८७) असा १८ विरुद्ध १५ असा ३ गुणांनी अतितटीच्या लढतीत सामना जिंकला. श्री समर्थतर्फे प्रतीक होडावडेकर याने ४:०० मि.,२:४० मि संरक्षण करत आक्रमणात १ गडी मारून अष्टपैलू कामगिरी केली. त्याला वराड फाटक याने १:०० मि संरक्षण करत व ४ गडी बाद करत तर जयेश नेवरेकर आणि आराध्य कीर यांनी ३ गडी प्रत्येकी बाद करत त्यांना उत्तम साथ दिली. सरस्वती तर्फे राहुल जावळे याने २:१२० मि संरक्षण करत व ५ गडी बाद करत तसेच खडका पारस याने २:०० मी व ३ गडी बाद करत उत्तम लढत दिली.
आज झालेल्या कुमार गटाच्या उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात विजय क्लब दादरच्या संघाने अमर हिंद मंडळाच्या संघाचा (६-९-५-६) असा १५ विरुद्ध ११ असा ४ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला घेतलेल्या तीन गुणांच्या आघाडीच्या जीवावर विजयने बाजी मारली विजयतर्फे विशाल मिस्त्री याने २ :१० व १:३०मि. संरक्षण केले तर आक्रमणात २ गडी बाद केले तर यश कांबळे याने २:०० व १:२० मिन. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले तर अमर हिंद मंडळा तर्फे मयूर कांबळे १:१०; १:५० संरक्षण करत १ गडी बाद केला तर मनीष कांबळे याने २:०० व १:२० मिन संरक्षण करत उत्तम लढत दिली.
आज झालेल्या कुमार गटाच्या तिसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या संघाने युवक क्रीडा मंडळाचा (५-१४-३) असा १४ विरुद्ध ८ असा एक डाव व ६ गुणांनी सामना एकतर्फी जिंकला. ओम समर्थ तर्फे नीरज गावास १:५० मि., १:५० मि संरक्षण करत आक्रमणात १ गडी मारले तर शुभम शिगवण याने २:०० मिन संरक्षण करत तर आक्रमणात ५ गडी मारून अष्टपैलू कामगिरी केली. त्याला सनी तांबे याने ३ गडी बाद करत उत्तम साथ दिली. युवक तर्फे ओंकार घवाली याने ०:५० व ०:४० मि संरक्षण करत व ३ गडी बाद करत चिवट झुंज दिली आज झालेल्या कुमार गटाच्या चौथ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र च्या संघाने ओम साईश्वर सेवा मंडळाच्या संघाचा (३-१३-४) असा १३ विरुद्ध ७ असा एक डाव व ६ गुणांनी सामना जिंकला. विद्यार्थी तर्फे निखिल महाले २:०० मिन व १ गडी तर शुभम शिंदे १:५० व ३ गडी तर आयुष्य गुरव याने ३ गडी बाद करत उत्कृष्ठ कामगिरी केली. ओम साईश्वर तर्फे भूपेश गायकवाड १:०० मि., ०:३० मि संरक्षण करत आक्रमणात १ गडी मारून उत्तम लढत दिली