मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपर किंग्जला १८४ धावांचे आव्हान
By Admin | Published: April 17, 2015 09:44 PM2015-04-17T21:44:09+5:302015-04-17T21:58:53+5:30
आयपीएलच्या सामन्यात सलग तिस-यांदा पराभवाला सामोरे जाणा-या मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला १८४ धावांचे आव्हान दिले आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात २० षटकात सात बाद १८३ धावा केल्या.
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. 18 - आयपीएलच्या सामन्यात सलग तिस-यांदा पराभवाला सामोरे जाणा-या मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला १८४ धावांचे आव्हान दिले आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात २० षटकात सात बाद १८३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवातीला खराब कामगिरी झाली. मात्र कप्तान रोहित शर्मा आणि केरॉन पोलार्ड यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ३१ चेंडूत अर्धशतक केले. तर केरॉन पोलार्डने
अर्धशतकी खेळी करत अवघ्या ३० चेंडूत पाच षटकार आणि चार चौकार लगावत सर्वाधिक ६४ धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या धावसंख्येत चांगली वाढ झाली. तसेच अंबाती रायडूनेही चांगली खेळी करत १६ चेंडूत २९ धावा केल्या. पार्थिव पटेल शून्यावर पायचित बाद झाला, तर लैडल सिमेन्स अवघ्या पाच धावांवर झेल बाद झाला. हरभजन सिंगने २१ चेंडूत २४ धावा केल्या, तो मोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाज आशिष नेहराने सर्वाधिक तीन आणि ब्राव्होने दोन बळी घेतले, तर पांडे आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक बळी घेतला.