मुंबई इंडियन्सला पराभवांची परतफेड करण्याची संधी
By admin | Published: May 21, 2017 01:09 AM2017-05-21T01:09:02+5:302017-05-21T01:09:02+5:30
यंदाच्या सत्रात मुंबई इंडियन्सने अद्याप पुणे सुपरजायंटवर विजय नोंदविलेला नाही. दोनदा साखळी लढतींमध्ये आणि एकदा प्ले आॅफमध्ये उभय संघ लढले तेव्हा पुण्यानेच बाजी मारली.
- रवी शास्त्री लिहितात...
यंदाच्या सत्रात मुंबई इंडियन्सने अद्याप पुणे सुपरजायंटवर विजय नोंदविलेला नाही. दोनदा साखळी लढतींमध्ये आणि एकदा प्ले आॅफमध्ये उभय संघ लढले तेव्हा पुण्यानेच बाजी मारली. योगायागोने पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मुंबईला मागील सर्व पराभवांची परतफेड करण्याची संधी असेल.
मागील सर्वच सामने एकतर्फी नव्हते. पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने झुंजार फटकेबाजी केली. प्ले आॅफमध्ये धोनीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत दोन षटकांत सामना फिरविला. खरे तर एका खेळाडूने कमाल करीत मुंबईला पाणी पाजले होते. पुणे संघाकडे असलेल्या या ताकदीचा अडथळा आज रात्री येऊ नये, याची मुंबई संघ काळजी घेणार आहे. बेन स्टोक्स आणि इम्रान ताहिर पुणे संघात नाहीत, याबद्दल मुंबई संघ खूश असेल.
स्टोक्स सर्वांत महागडा खेळाडू का आहे, हे त्याने कामगिरीद्वारे दाखवून दिले. आणीबाणीच्या वेळी तो सर्वांत पुढे राहिला. ताहिरनेदेखील मोक्याच्या क्षणी बळी घेतले. या दोघांची उणीव पुणे संघाला भासणार आहे. या दोघांच्या अनुपस्थितीचा काही फरक जाणवणार नाही, असे हा संघ म्हणूच शकणार नाही. मुंबईने मागच्या आठवड्यात दोन महत्त्वाचे बदल केले. अंबाती रायुडू आणि मिशेल जॉन्सन यांना ब्रेक देण्यात आला होता. दुसरीकडे लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांच्या चेंडूवर फटकेबाजी करणे कठीण आहे. दीर्घकालीन लीगच्या अखेरीस आता कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. अशा वेळी खेळाडूंचा
फॉर्म टिकून राहावा, अशीच व्यवस्थापनाची मनोमन इच्छा असेल. मलिंगा आणि बुमराह यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष आहे. या योद्ध्यांनी प्रत्येकाला पाणी
पाजले आहे.
अंतिम सामना त्यांच्या कामगिरीमुळेच गाजावा, असे अनेकांना वाटत असावे. अखेर या लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष
लागले आहे. (टीसीएम)