मुंबई इंडियन्सने लढवय्या बाणा दाखविला

By admin | Published: April 16, 2017 03:38 AM2017-04-16T03:38:56+5:302017-04-16T03:38:56+5:30

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतरही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लढवय्या बाणा दाखवित विजय साकारला.

Mumbai Indians have shown their bowlers | मुंबई इंडियन्सने लढवय्या बाणा दाखविला

मुंबई इंडियन्सने लढवय्या बाणा दाखविला

Next

- सुनील गावसकर लिहितात...

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतरही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लढवय्या बाणा दाखवित विजय साकारला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गेल, कोहली आणि डिव्हीलियर्स यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्सचा डाव माफक धावसंख्येत रोखण्याचा पराक्रम केला. पण, त्यानंतर सॅम्युअल बद्रीने हॅट््ट्रिक नोंदवित मुंबई संघाला दडपणाखाली आणले होते.
टी-२० क्रिकेटमध्ये संघ कुठलीही अनपेक्षित चाल खेळण्याचा प्रयत्न करतात. मुंबई इंडियन्सने मॅक्लेनघनला बढती दिली, पण त्यांची ही योजना सपशेल अपयशी ठरली. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा भारतीय संघातर्फे टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला खेळतो, पण कुठल्यातरी विचित्र कारणामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मधल्या फळीत खेळत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळू शकलेली नाही. मुंबई इंडियन्सने जसे हरभजनला खेळविण्याचा निर्णय घेतला तसा कर्णधाराला सलामीला पाठविण्याचा निर्णय घ्यायला हवा. लेग स्पिनरविरुद्ध रोहितची अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे तो सलामीला खेळला, तर त्याला फटकेबाजीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
लेग स्पिनरविरुद्ध फलंदाजी करताना त्याला चेंडूपर्यंत पोहोचावे लागते, पण सलामीला खेळला तर वेगवान गोलंदाजांचे चेंडू बॅटवर येतात आणि अपेक्षित फटके खेळण्याची संधी असते. पोलार्डने महत्त्वाची खेळी करीत विजय साकारला. त्याने कुणाल पांड्याचे साथीने आक्रमक फलंदाजी करीत संघावरील संकट दूर केले. लक्ष्य मोठे नसले, तरी पुन्हा एकदा बँगलोर संघ बचाव करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे गोलंदाजांना फलंदाजांकडे अंगुलीनिर्देश करण्याची संधी आहे. मुंबई संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल.
मुंबई संघाला यानंतर पहिल्या विजयामुळे मनोधैर्य उंचावलेल्या गुजरात संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुजरात संघही गोलंदाजीमध्ये संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे, पण टायच्या समावेशामुळे त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आली आहे.
विजयाने सुरुवात करणारा पुणे संघ संघर्ष करीत आहे. पुणे संघाची भिस्त स्मिथ व स्टोक्सच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अंतिम षटकांमध्ये त्यांना धावगती वाढविण्यात अपयश येत आहे. धोनीही फॉर्मात नसल्यामुळे पुणे संघाला अपेक्षित धावसंख्या उभारता आलेली नाही. ड्वेन स्मिथ व मॅक्युलम आक्रमक फलंदाजी करीत असताना स्टोक्स व ठाकूर यांच्या गोलंदाजीमुळे पुणे संघाचा
नक्कीच हिरमोड झाला असेल.
रविवारी चाहत्यांना पुन्हा एकदा
रंगतदार लढती बघण्याची संधी मिळणार आहे. (पीएमजी)

Web Title: Mumbai Indians have shown their bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.