मुंबई इंडियन्समध्ये आत्मविश्वासाचा अभाव : रोहित
By admin | Published: April 16, 2015 01:29 AM2015-04-16T01:29:37+5:302015-04-16T01:29:37+5:30
आयपीएल-८ मध्ये सलग तीन पराभवाने खचलेल्या माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच रिकी पाँटिंग आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघात आत्मविश्वासाचा अभाव असल्याची कबुली दिली आहे.
मुंबई : आयपीएल-८ मध्ये सलग तीन पराभवाने खचलेल्या माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच रिकी पाँटिंग आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघात आत्मविश्वासाचा अभाव असल्याची कबुली दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, ‘आम्ही तीन सामने गमावल्याची मला जाणीव आहे. अनेक चुका झाल्या. या चुकांवर तोडगा शोधण्यात आम्ही व्यस्त आहोत. जे अडथळे सहज पार करायला हवे होते, ते करण्यात आम्ही अपयशी ठरलो. गोलंदाजी आणि फलंदाजीतही काही उणिवा आहेत. सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वासाचा संचार आणावा लागेल.’
रिकी पाँटिंग म्हणाला, ‘संघ म्हणून आमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे. स्पर्धेत आतापर्यंत तरी झकास सुरुवात होऊ शकली नाही. संपूर्ण ४० षटके वर्चस्वपूर्ण खेळ करावाच लागेल. २०-३० षटके वर्चस्व गाजवून चालणार नाही.’
मुंबईला गतविजेता कोलकाता, राजस्थान रॉयल्स आणि गत उपविजेत्या किंग्स इलेव्हन पंजाबने नमविले आहे. यावर रोहितचे मत असे, की गेल्या वर्षीही संघाला पहिल्या पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही आम्ही प्ले आॅफमध्ये धडक दिली. यंदादेखील अशीच मुसंडी मारण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)