मुंबई इंडियन्सकडून आयपीएलची ट्रॉफी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण
By admin | Published: May 22, 2017 02:09 PM2017-05-22T14:09:43+5:302017-05-22T18:16:58+5:30
अनंत अंबानी यांनी आज सकाळी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - थरारक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला नमवून तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. धमाल, मस्ती आणि सेलिब्रेशन करतानाच मुंबई इंडियन्सने आपल्या आस्थेचे दर्शन घडवले आहे. मुंबई इंडियन्सचे फ्रॅन्चायझी अनंत अंबानी यांनी आज सकाळी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी अर्पण केली.
काल झालेल्या आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेर मुंबईकर पुण्याला भारी पडले होते. माफक धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत करत आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला होता. मुंबईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले. त्याबरोबरच आयपीएलमध्ये तीन विजेतेपदे पटकावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला.
मुंबईने दिलेल्या 130 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याला 20 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारता आली होती. एकापेक्षा एक तगडे फलंदाज दिमतीला असूनही पुण्याचा संघ आयपीएलच्या विजेतेपदापासून अवघ्या एका धावेने वंचित राहिला.
Maharashtra: IPL trophy taken to Shree Siddhivinayak Ganapati temple to seek blessings, after Mumbai Indians won the #IPL2017 title pic.twitter.com/V9HOuUeGSO
— ANI (@ANI_news) May 22, 2017