मुंबई इंडियन्सचे लक्ष्य केकेआरविरुद्ध विजयाचे
By admin | Published: April 13, 2016 03:04 AM2016-04-13T03:04:20+5:302016-04-13T03:04:20+5:30
आयपीएलच्या नवव्या सत्रात सलामीला पुणे रायझिंग सुपर जॉयन्टस्कडून नऊ गड्यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला आज बुधवारी
कोलकाता : आयपीएलच्या नवव्या सत्रात सलामीला पुणे रायझिंग सुपर जॉयन्टस्कडून नऊ गड्यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला आज बुधवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करीत विजयी वाटेवर परतण्यासाठी कंबर कसली आहे.
केकेआर आणि मुंबईची स्पर्धेतील सुरुवात वेगवेगळ्या तऱ्हेने झाली. नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी नमविले, तर मुंबईचा नऊ गड्यांनीच पुण्याकडून पराभव झाला. केकेआरचा हुकमी एक्का विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण आहे. तो वडिलांच्या निधनानंतर संघात परतला. आयसीसीने त्याची गोलंदाजी शैली योग्य ठरविली. ४५ वर्षांचा ब्रॅड हॉग याच्यासोबत फिरकी गोलंदाजीचा समन्वय केकेआरकडे आहे. त्यासाठी अंतिम एकादशमध्ये नारायण आणि हॉगला संधी द्यावी लागेल. नारायणने चार सत्रांत ७४ गडी बाद केले होते. दुसरीकडे पहिल्या सामन्यात १९ धावांत दिल्लीचे तीन गडी बाद करणारा हॉगदेखील खेळण्यासाठी सज्ज आहे. दोन फिरकी गोलंदाज खेळवायचे झाल्यास कर्णधार गंभीर जॉन हेस्टिंग्सला बाहेर ठेवेल. (वृत्तसंस्था)
कोलकाता नाइट रायडर्स :
गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज,
जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.