मुंबई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन!

By admin | Published: May 21, 2017 08:23 PM2017-05-21T20:23:50+5:302017-05-21T23:49:55+5:30

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने पुण्यावर अवघ्या एका धावेने मात करत

Mumbai IPL champion for the third time! | मुंबई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन!

मुंबई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन!

Next
> हैदराबाद, दि. 21 -  मुंबईने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याने सावध सुरुवात केली आहे. सलामीवीर राहुल त्रिपाठी स्वस्तात माघारी परतल्यावर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या 10 षटकांत पुण्याला 1 बाद 58 धावांपर्यंत मजल मारून दिली.  
 
तत्पूर्वी आयपीएलच्या महाअंतिम लढतीत पुण्याच्या गोलंदाजांनी मुंबईकरांना कात्रजचा घाट दाखवला. जयदेव उनाडकट, अॅडम झम्पा आणि डॅन ख्रिस्टियान  यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबईला 20 षटकांत 8 बाद  129 धावांवर रोखले.
 
 सात बाद 79 अशी बिकट अवस्था  झालेल्या मुंबईला कृणाल पांड्याने सावरले. 38 चेंडूत 47 धावांची खेळी करणाऱ्या  कृणालने  मिचेल जॉन्सनच्या साथीने आठव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करत मुंबईला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पुण्याकडून उनाडकट, झम्पा आणि ख्रिस्टियान यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. 
 
 आयपीएल 10 च्या  अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. जयदेव उनाडकटने भेदक मारा करत सुरुवातीलाच पार्थिव पटेल (4) आणि लेंडल सिमॉन्स (3) या मुंबईच्या सलामीवीरांना परतीची वाट दाखवली.  पुण्याच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे मुंबईला पहिल्या पाच षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ 16 धावा जमवता आल्या होत्या. अशा परिस्थितीत  कर्णधार रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत पुण्याच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला करत दबाब कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहितचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
 
मुंबईचा संघ सावरतोय असे वाटत असतानाच रायडू 12 धावा काढून बाद झाला. त्यानंतर  रोहित (24) आणि कायरन पोलार्ड (7) पाठोपाठ बाद झाल्याने मुंबईचा डाव पुरता अडचणीत आला. पाठोपाठ हार्दिक पांड्या (10) आणि कर्ण शर्माही माघारी परतल्याने मुंबईची अवस्था 7 बाद 79 अशी झाली होती.   
 

Web Title: Mumbai IPL champion for the third time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.