चेन्नई एक्स्प्रेसपुढे मुंबई लोकल घसरली

By admin | Published: October 29, 2014 02:14 AM2014-10-29T02:14:17+5:302014-10-29T02:14:17+5:30

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सुक असलेल्या चेन्नईयन संघाने मंगळवारी मुंबई सिटी संघावर 5-1 असा दणदणीत विजय साजरा केला.

Mumbai local train collapse near Chennai Express | चेन्नई एक्स्प्रेसपुढे मुंबई लोकल घसरली

चेन्नई एक्स्प्रेसपुढे मुंबई लोकल घसरली

Next
चेन्नई : इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सुक असलेल्या चेन्नईयन संघाने मंगळवारी मुंबई सिटी संघावर 5-1 असा दणदणीत विजय साजरा केला. एलानो ब्लमर, जेजे लाल्पेखलुआ आणि स्टीवन मेंडोझा या इंजिनांमुळे चेन्नईयन एक्स्प्रेस सुसाट धावली. एक्स्प्रेसशी स्पर्धा करणो मुंबईला जमले नाही आणि त्यांची लोकल मध्यांतरालाच रुळावरून घसरली. 
तीन सामन्यांच्या बंदीनंतर निकोलास अनेल्का मुंबईकडून पहिलीच लढत खेळण्यासाठी उतरला, तर सय्यद रहिम नबी हाही दुखापतीतून सावरल्याने मुंबईचे पारडे जड वाटत होते. मात्र, 8व्या मिनिटाला यजमान चेन्नईयन संघाने मुंबईला धक्का दिला. मॅन्युएल फ्रायड्रिक याने चुकीच्या पद्धतीने मेंडोझा याला टॅकल केल्याने चेन्नईयनला पहिली पेनल्टी किक मिळाली. एलानोने ही पेनल्टी गोलमध्ये रूपांतरित करून यजमानांना 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. मुंबईचे संघ व्यवस्थापक पीटर रिड वारंवार खेळाडूंना आक्रमक खेळ करण्याचा इशारा देत होते, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला असे दिसले नाही. 26व्या मिनिटाला एलानोने दिलेल्या पासवर  लाल्पेखलुआ याने लेफ्ट किक मारून चेन्नईयनसाठी दुसरा गोल केला. 
 41व्या मिनिटाला चेन्नईयनला आनंद साजरा करण्याची आणखी संधी उपलब्ध करून दिली. 41व्या मिनिटाला मेंडोजाने पहिला गोल नोंदवला. 44व्या मिनिटाला   मेंडोजाने डाव्या बाजूने अगदी सहजपणो चेंडू गोलपोस्टमध्ये टाकून हाफ टाइमर्पयत यजमानांना 4-क् अशी आघाडी मिळवून दिली 69व्या मिनिटाला एलानो याने गोल करून चेन्नईचा विजय पक्का केला.  मुंबईकडून नबीने 88व्या मिनिटाला पहिल्या आणि एकमेव गोलची नोंद केली. 
 

 

Web Title: Mumbai local train collapse near Chennai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.