मुंबई इंडियन्सचं राइजिंग पुणे सुपरजायंट्ससमोर 122 धावांचं आव्हान
By admin | Published: April 9, 2016 09:50 PM2016-04-09T21:50:45+5:302016-04-09T21:50:45+5:30
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राइजिंग पुणे सुपरजायंट्ससमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ९ - इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राइजिंग पुणे सुपरजायंट्ससमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी उतरलेला मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीलाच ढासळला. राइजिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखत 40 धावांत अर्धा संघ गारद केला होता.
मुंबई इंडियन्स 100 धावा तरी पुर्ण करेल की नाही अशी शंका होती. मात्र हरभजन सिंगने तुफान फटकेबाजी करत संघाला सावरलं आणि संघाचं शतकही पुर्ण केलं. हरभजन सिंगने 30 चेंडूत 45 धावा केल्या तर अंबाती रायडूने 22 धावा केल्या. खालच्या फळीतील खेळाडूंनी संयमी खेळी खेळल्याने पहिल्याच सामन्यात ऑल आऊट होण्यापासून संघ वाचला. मुंबई इंडियन्सने 8 विकेट गमावत 121 धावा केल्या आहेत. राइजिंग पुणे सुपरजायंट्सला 122 धावांची गरज असून विजयाने आपली सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
राइजिंग पुणे सुपरजायंट्सच्या बॉलरने सुरुवातीला उत्तम कामगिरी केली मात्र नंतर धावा रोखू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सला 100 धावांच्या आता ऑल आऊट करण्याची संधी त्यांच्याकडे होती. इशांत शर्मा आणि मिशेल मार्शने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले तर बाकीच्या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), लिंडेल सिमंस, केरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, मिशेल मॅक्लीनघन, जोस बटलर, श्रेयस गोपाल, आर विनय कुमार
राइजिंग पुणे सुपरजायंट्स :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, आर अश्विन, ईशांत शर्मा, आर पी सिंह, रजत भाटिया, मुरुगन अश्विन