मुंबई सुसाट...
By admin | Published: April 23, 2017 02:54 AM2017-04-23T02:54:37+5:302017-04-23T03:06:24+5:30
फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबई इंडियन्सने विजयाचा ‘षटकार’ नोंदवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४ धावांनी
- रोहित नाईक, मुंबई
फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबई इंडियन्सने विजयाचा ‘षटकार’ नोंदवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४ धावांनी पराभव केला. यासह १२ गुणांची कमाई करताना मुंबईकरांनी गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद १४२ अशी मजल मारली. या वेळी मुंबईचा विजयी अश्वमेध दिल्लीकर रोखणार, अशीच शक्यता होती. परंतु, गोलंदाजांनी ठराविक अंतराने बळी घेत दिल्लीकरांना १२८ धावांवर रोखले. मिशेल मॅक्लेनघनने २४ धावांत ३ बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मिशेल जॉन्सनने एक षटक निर्धाव टाकत दिल्लीकरांना जखडवून ठेवले.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १४२ धावा (जोस बटलर २८, किरॉन पोलार्ड २६, हार्दिक पांड्या २४; अमित मिश्रा २/१८, पॅट कमिन्स २/२०.) वि. वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १२८ धावा (ख्रिस मॉरिस ५२*, कागिसो रबाडा ४४; मिशेल मॅक्लेनघन ३/२४, जसप्रीत बुमराह २/२१).