मुंबई विजयी मार्गावर

By Admin | Published: February 6, 2016 03:12 AM2016-02-06T03:12:57+5:302016-02-06T03:12:57+5:30

झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले.

Mumbai on the winning track | मुंबई विजयी मार्गावर

मुंबई विजयी मार्गावर

googlenewsNext

मुंबई : झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. श्रेयश अय्यरने दुसऱ्या डावात शानदार ८१ धावांची खेळी केली.
म्हैसूर येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच मुंबईने आवश्यक २ बळी घेत झारखंडला १७२ धावांत गुंडाळले. यानंतर मुंबईकरांनी दुसऱ्या डावाची आक्रमक सुरुवात करताना झारखंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमणाच्या नादात बळी गेल्याने मुंबईकरांचा डाव मर्यादित राहिला. पुन्हा एकदा श्रेयश अय्यरने शानदार खेळी करताना १०६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. तर कर्णधार अभिषेक नायरने ७७ चेंडूंत ७ चौकार मारताना ४३ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांच्या निर्णायक फटकेबाजीमुळे मुंबईला दुसऱ्या डावात दोनशेचा टप्पा गाठता आला. समर कद्री याने आपल्या फिरकीच्या जोरावर ६२ धावांत ५ खंदे फलंदाज बाद करताना मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली. तर राहुल शुक्ला आणि कौशल सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या डावात सावध सुरुवात करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने सलामीवीर आनंद सिंगचा बळी मिळवला. तत्पूर्वी ८ बाद १५० या धावसंख्येवरून सुरुवात करताना झारखंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मुंबईकरांना यश आले. शार्दुल ठाकूरने झारखंडचे शेपूट जास्त वेळ वळवळणार नाही याची दखल घेत नाबाद फलंदाज कौशल सिंग व शेवटचा फलंदाज समर कद्री यांना बाद केले. ठाकूरने हेरवाडकर व अब्दुल्लाप्रमाणे ३ बळी घेत मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली.संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : ११४.४ षटकांत सर्वबाद ४१६ धावा. झारखंड (पहिला डाव) : ७१.५ षटकांत सर्वबाद १७२ धावा (कौशल सिंग ४३, आनंद सिंग ३९; अखिल हेरवाडकर ३/२६, शार्दुल ठाकूर ३/३७, अब्दुल्ला ३/५०). मुंबई (दुसरा डाव) : ६३.१ षटकांत सर्वबाद २४५ धावा (श्रेयश अय्यर ८१, नायर ४३; समर कद्री ५/६५).
झारखंड (दुसरा डाव) : १३ षटकांत १ बाद २८ (शिव गौतम खेळत आहे १२, आनंद सिंग १२, विराट सिंग खेळत आहे ४; इक्बाल अब्दुल्ला १/११)

Web Title: Mumbai on the winning track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.