मुंबईकरांनी साहेबांना झुंजवले

By admin | Published: March 15, 2016 03:20 AM2016-03-15T03:20:55+5:302016-03-15T03:20:55+5:30

दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंडला सराव सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) एकादश संघाविरुद्ध विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले.

Mumbaikar fought the Saheb | मुंबईकरांनी साहेबांना झुंजवले

मुंबईकरांनी साहेबांना झुंजवले

Next

मुंबई : दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंडला सराव सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) एकादश संघाविरुद्ध विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अखेरच्या क्षणी मुंबईकरांवर दडपण राखण्यात यशस्वी ठरल्याने इंग्लंडने १४ धावांनी रोमांचक बाजी मारली.
टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ दुबळा नसतो, याची प्रचीती या सामन्यात आली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ८ बाद १७७ अशी समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकरांना २० षटकांत ६ बाद १६३ धावाच काढता आल्या.
या सामन्यात जेम्स विन्स, जोस बटलर, आदिल रशीद व डेव्हिड विले मुंबईकडून खेळले. जय बिस्टा - श्रेयश अय्यर यांनी ५७ धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली. अय्यर (१६) बाद झाल्यानंतर बिस्टा - विन्स जोडीने मुंबईला सावरण्याले.
बिस्टाने ३७ चेंडंूत ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा फटकावल्या, तर विन्सने ३८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ४५ धावांची खेळी
केली. जोस बटलरने (२५) छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र
बटलर परतल्यानंतर मुंबईकर दबावाखाली खेळ उंचावण्यात अपयशी ठरले. रिसे टोपले व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला नमवले. त्याआधी, ज्यो रुट (३४ चेंडूंत ४८ धावा), अ‍ॅलेक्स
हेल्स (२३ चेंडूंत ३७ धावा), जेसन
रॉय (२१ चेंडूंत ३२) व बेन स्टोक्स
(२३ चेंडूंत ३०) यांच्या जोरावर
इंग्लंडने समाधानकारक मजल
मारली. डेव्हिड विलेने ३५ धावांत
३ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला, तर शार्दुल ठाकूर
व आदिल रशीद यांनी प्रत्येकी २
बळी घेतले.
(क्रीडा प्रतिनिधी)

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १७७ धावा (ज्यो रुट ४८, अ‍ॅलेक्स हेल्स ३७, जेसन रॉय ३२, बेन स्टोक्स ३०; डेव्हिड विले ३/३५) वि. वि. एमसीए : २० षटकांत ६ बाद १६३ धावा (जय बिस्टा ५१, जेम्स विन्स ४५; रिसे टोपले २/२६, ख्रिस जॉर्डन २/३४).

Web Title: Mumbaikar fought the Saheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.